Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभारतात 'येथे' आढळला लिथीयमचा साठा

भारतात ‘येथे’ आढळला लिथीयमचा साठा

नवी दिल्ली | New Delhi

भारतात सध्या प्रदूषण नियंत्रणाच्या (Pollution Control) दृष्टीने शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले जात आहेत. इंधन बचत, (Fuel savings) चलन बचत आणि प्रदूषण नियंत्रणासाठी पेट्रोल आणि डीझेल वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहने बाजारात यावीत यासाठी मोठे प्रयत्न केले जात आहेत, मात्र या वाहनांसाठी लागणाऱ्या बॅटरीमध्ये (battery) वापरला जाणारा ‘लिथियम’ धातू हा उपलब्ध होणे आवश्यक असते.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाईल फोन यांसारख्या उपकरणांसाठी बॅटरीच्या निर्मितीमध्ये लिथियम धातूचा वापर प्रामुख्याने केला जातो. भारतात (India) बॅटरी बनवण्यासाठी आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिनासारख्या देशांतून लिथियम आयात केले जात होते. त्यामुळे या धातूच्या उपलब्धतेविषयी चिंता व्यक्त केली जात होती.

मात्र, आता ही चिंता थोडी हलकी झाली आहे. भारतात पहिल्यांदाच काश्मीरमध्ये (Kashmir) लिथीयमचा (Lithium) साठा आढळला आहे. ‘जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने’ (GSI) ही माहिती दिली. देशात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर लिथीयमचा साठा सापडला आहे. लिथीयमचा साठा आढळल्याने भारतातील इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicle) आणि मोबाइल बॅटरी (Mobile Battery) निर्मिती क्षेत्राला मोठा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. लिथीयमसाठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहावे लागत आहे. या साठ्यामुळे लिथीयमबाबत काही प्रमाणात भारत आत्मनिर्भर होऊ शकतो.

जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचा साठा उपलब्ध असल्याने परदेशातून होणाऱ्या आयातीत घट होणार आहे. लिथीयमची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहने आणि मोबाइल फोनसाठी बॅटरी तयार करण्यासाठी आता भारताची जम्मू आणि काश्मीरमधील लिथीयम साठ्यावर गरज भागवली जाऊ शकते.जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) रियासी जिल्ह्यात हा लिथीयम धातूचा साठा मिळाला आहे. हा साठा जवळपास 59 लाख टन इतका असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे ऊर्जाक्षेत्राला थोडी उभारी मिळेल अशी आशा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या