ग्राहकांनो! मे महिन्यात बँकांना 'इतक्या' सुट्ट्या

ग्राहकांनो! मे महिन्यात बँकांना 'इतक्या' सुट्ट्या

मुंबई | Mumbai

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (reserve bank of india) नुकतीच मे (may) महिन्यातील सुट्ट्यांची यादी (Holiday list) जाहीर केली आहे. मे महिन्यात बँकांना (Bank) किती सुट्ट्या आहेत हे या यादीत जाहीर करण्यात आले आहे....

प्रत्येक राज्यातील सणांनुसार बँकाच्या सुट्टीची यादी (Bank Holiday List) जाहीर केली जाते. त्यामुळे मे महिन्यात जर बँकेत जायचे असेल तर त्याचे नियोजन करूनच बँकेत जा.

महाराष्ट्रात मे महिन्यात एकूण नऊ दिवस सुट्टी असणार आहे. म्हणजेच फक्त २२ दिवस बँकेचे कामकाज चालणार आहे. सध्या ग्राहकांनी जरी ऑनलाईल प्रणालीचा अवलंब केला असला तरी एखाद्या आवश्यक कामकाजासाठी बँकेत जाऊ लागू शकते.

ग्राहकांनो! मे महिन्यात बँकांना 'इतक्या' सुट्ट्या
Visual Story : हार्दिक पटेलांचा नवा लूक चर्चेत; काँग्रेसला करणार बाय-बाय?

त्यामुळे मे महिन्यातील सुट्या जाणून घ्या. जेणेकरून तुमची पंचायत होणार नाही. सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे.....

१ मे महाराष्ट्र दिन.

३ मे रमजान ईद

८ मे : रविवारची साप्ताहिक सुट्टी.

१४ मे : शनिवारची साप्ताहिक सुट्टी.

१५ मे : रविवारची साप्ताहिक सुट्टी.

१६ मे : बुद्ध पौर्णिमा

२२ मे : रविवारची साप्ताहिक सुट्टी.

२८ मे : शनिवारची साप्ताहिक सुट्टी.

२९ मे : रविवारची साप्ताहिक सुट्टी.

ग्राहकांनो! मे महिन्यात बँकांना 'इतक्या' सुट्ट्या
२०१७ सालीच ठरलंय! भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी; शेलारांचा गौप्यस्फोट
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com