लाखोंचा मद्यसाठा जप्त

लाखोंचा मद्यसाठा जप्त

पुनदखोरे । वार्ताहर Punad Khore

विदेशी मद्य गोवा ( Goa )राज्यात विक्रीसाठी नेत असताना राज्य उत्पादन शुल्क नाशिकमार्फत कारवाई करत साधारण 27 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क नाशिक (State Excise Nashik) कार्यालयाच्या अधिपत्याखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग यांनी अक्राळे फाटा, इंडियन ऑईलच्या पंपासमोर, वनारवाडी शिवार (ता. दिंडोरी) या ठिकाणी सापळा रचून आयशर कंपनीचे मालवाहतूक करणार्‍या वाहना (एम. एच.48. ए. वाय.3663)ची तपासणी केली असता वाहन पूर्णतः रिकामे दिसून आले. परंतु या वाहनाच्या कॅबिनच्या मागच्या बाजूस व वाहनाच्या खालच्या बाजूस संशय येणार नाही अशा दृष्टीने एका विशिष्ट पद्धतीचा कप्पा बनवण्यात आला होता.

या कप्प्यामध्ये विदेशी मद्यसाठा वाहतूक करताना आढळून आल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 1369.20 ब. लि.चे एकूण 153 बॉक्स तसेच विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे 143 बॉक्स, किंगफिशर स्ट्राँग बियरचे 10 बॉक्स त्याचप्रमाणे सहाचाकी आयशर कंपनीची गाडी असा एकूण 27 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी हंसराजभाई मोहनभाई ठाकूर (रा. चलथान, ता. पलसाना, जि. सुरत) यास ताब्यात घेतले असून इतर फरार आरोपींत वाहनचालक, मद्यसाठा पुरवठादार, खरेदीदार, विक्री करणारा आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईत विजय सूर्यवंशी (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क), सुनील चव्हाण (संचालक, अंबलबजावणी व दक्षता, राज्य उत्पादन शुल्क), अर्जुन ओहोळ (विभागीय उपायुक्त) तसेच एस. व्ही. गर्जे (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण विभागाचे निरीक्षक एस. के. सहस्त्रबुद्धेे, एम. बी. सोनार, आर. एम. डमरे, जवान सर्वश्री डी. एन. आव्हाड, एम. जी. सातपुते, व्ही. टी. कुवर, पी. एम. वाईकर यांनी यशस्वीरीत्या कामगिरी पार पाडली असून व्ही. एस. कौसडीकर (निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अ. विभाग) तसेच करंजाळी भरारी पथक क्र.3 दिंडोरी यांच्या विभागातील अधिकारी, कर्मचारी आदींनी मदत केली. या गुन्ह्याचा पुढील तपास कळवण विभागाचे निरीक्षक एस. के. सहस्त्रबुद्धे करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com