अंतिम मुदतीपुर्वीच पॅन कार्ड आधारशी करा लिंक नाही तर....

अंतिम मुदतीपुर्वीच पॅन कार्ड आधारशी करा लिंक नाही तर....

जळगाव jalgaon

पॅन कार्ड (PAN card)आधार कार्डशी (Aadhaar card) लिंक (Link) करणे अनिवार्य आहे. जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केलेले नसेल, तर तुम्हाला ते लगेच लिंक करावे लागेल कारण त्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे. 31 मार्च 2023 पर्यंत प्रत्येकाने आपले पॅन कार्ड आधारशी लिंक करावे लागेल. असे न झाल्यास, पॅन कार्ड अवैध किंवा निष्क्रिय (Invalid or inactive) केले जाईल. कोणत्याही आर्थिक व्यवहारात त्याचा वापर करता येणार नाही.

पॅन आधारकार्डशी जोडलेले आहे की नाही हे असे तपासा?


प्राप्तिकर विभागाच्या https://www.incometax.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
क्विक लिंक्स अंतर्गत लिंक आधार स्टेटस यावर क्लिक करा.
पॅन व आधार क्रमांक भरा आणि व्ह्यू लिंक आधार स्टेटस वर क्लिक करा.
हे दोन्ही क्रमांक संलग्न झालेले नसतील तर “PAN not linked with Aadhaar. Please click on the “Link Aadhaar” link to link your Aadhaar with PAN” हा संदेश दिसू लागेल.
दोन्ही क्रमांक संलग्न झालेले असतील तर “Your Aadhaar is linked with PAN” हा संदेश दिसेल.

पॅन-आधार ऑनलाइन जोडणी कशी कराल?


प्राप्तिकर विवरण ऑनलाइन भरणा करण्यासाठी असलेल्या www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटवर जा.
लिंक आधार वर क्लिक करा.
तुमचा पॅन क्रमांक टाइप करा, आधार क्रमांक टाइप करा आणि आधार कार्डवर आहे त्याप्रमाणे तुमचे नाव व अन्य तपशील भरा.

तुम्ही भरलेल्या तपशिलाची खात्री करा आणि सबमिट करा.
जोडणी झाल्याचा संदेश स्क्रिनवर दिसू लागेल आणि एक ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर येईल.
अशाप्रकारे तुम्हाला पॅन आधारकार्डशी जोडता येईल त्यामुळे वेळ न घालवता लवकरात लवकर पॅन आधारकार्डशी जोडा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com