नाशकात 'या' ठिकाणी मिळतील रेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब औषधे

काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करणार - दुष्यंत भामरे
नाशकात 'या' ठिकाणी मिळतील रेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब औषधे

नाशिक : देशात, राज्यात तसेच जिल्ह्यातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांचा साठा मर्यादीत असला तरी तो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ज्या १९ औषध वितरकांकडे ही औषधे उपलब्ध आहेत त्यांची यादी जाहिर करण्यात आली आहे.

तसेच औषध वितरणातील होणारा काळाबाजार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर करण्यात येणार असून, या औषधांच्या काळाबाजाराबाबत काही माहिती असल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या टोल फ्री क्र. 1800222365 वर देण्यात यावी, असे आवाहन नाशिक विभागाच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांनी केले आहे.

या संदर्भात आज जारी केलेल्या या प्रसिद्धी पत्रकात भामरे म्हणाले, मुंबई शहरातील काही औषध वितरक व रुग्णालय यांना, मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन या औषधांची उपलब्धता, त्यांचे वितरण व आकारण्यात येणारी किंमत याबाबतची माहिती घेतली.

तसेच आयुक्तालयामध्ये मे. सिप्ला व मे. हेट्रो हेल्थकेअर या उत्पादकाचे प्रतिनिधी, वितरक, विक्रेते यांच्या समवेत बैठक घेऊन सध्या असणारा उपलब्ध साठा, भविष्यात उपलब्ध होणारा साठा तसेच वितरण प्रणाली व त्यातील दोष दुर करणे या बाबत सविस्तर चर्चादेखील यावेळी झाली.

यासंदर्भात, मुंबई व ठाणे मधील कार्यरत औषध निरीक्षक, सहायक आयुक्त (औषधे), सह आयुक्त (औषधे) यांची बैठक घेण्यात आली. करानाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने रेमडेसिव्हीर आणि टॉसिलिझुमॅब या औषधांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

मात्र, या औषधांचे उत्पादन व पुरवठा मर्यादित आहे. त्यासाठी या औषधांची मुबलक प्रमाणात उपलब्धता करून, वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणे आणि या संदर्भातील काळाबाजार रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांनी दिल्या आहेत.

सदर औषधांचा मुबलक प्रमाणात पुरवठा होण्यासाठी मे. हेट्रो हेल्थकेअर रेमडेसिव्हीरचे उत्पादन हैद्राबाद येथे करीत असून, लवकरच नवसारी गुजरात येथे करणार आहे. तसेच मे. सिप्ला यांचे रेमडेसिव्हीर चे उत्पादन बडोदा, गुजरात येथे सुरू असुन भविष्यात गोवा येथे करणार आहे.

मे. मायलॉन लि. या कंपनीला सुद्धा या औषधाचे उत्पादन करण्यासाठी केंद्र शासनाकडून अनुमती मिळालेली आहे व यांचे उत्पादन बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या औषधांचा पुरवठा वाढण्यास मदत होईल.

रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सदर औषधे महाराष्ट्रभर समप्रमाणात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. तसेच ह्या औषधांचे वितरण काही ठराविक वितरकांकडून न करता, त्यांची विक्री अधिक वितरकांद्वारे करण्याच्या सुचनाही संबंधीत कंपनीला देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रासाठी रेमडेसिव्हीर या औषधाचे साधारणतः 21 हजार 500 व्हाईल्स उपलब्ध होणार आहेत. तसेच टॉसिलिझुमॅब या औषधाची जागतिक स्तरावर अधिक मागणी असल्या कारणाने जगभरात तुटवडा निर्माण झालेला आहे. तरीसुध्दा या औषधाचा जास्तीत जास्त साठा आयात करून जिल्ह्यात अधिक प्रमाणात साठा उपलब्ध करण्यासाठी वितरक कंपनीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत असेही या प्रसिद्धी पत्रकाद्वारे सहआयुक्त भामरे यांनी आज सांगितले.

हे आहेत वितरक...

1. नाशिक पिंक फार्मसी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड. एन डी सी सी बँक जवळ , समर्थ हॉटेल, नाशिक, विजय दिनानी रेमडेसिव्हर/टॉसिलिझुमॅब

2. सुर्या मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स, सुर्या आर्केड, निमाणी बस स्टॉप जवळ, नाशिक अतुल अहिरे रेमडेसिव्हर/टॉसिलिझुमॅब

3. सिक्स सिगमा मेडीकल ॲण्ड रिसर्च लिमिटेड, महात्मा नगर, पाण्याच्या टाकीजवळ, नाशिक अभय बोरसे रेमडेसिव्हर/टॉसिलिझुमॅब

4. सुरभी मेडिकल ॲण्ड जनरल स्टोअर्स सुर्या हॉस्पिटल, मुंबई नाका, नाशिक शिवाजी पाटील रेमडेसिव्हर/टॉसिलिझुमॅब

5. व्होकार्ट हॉस्पिटल लिमिटेड, वाणी हाऊस, वडाळा नाका,मुंबई आग्रा रोड नाशिक, किरण कुलकर्णी रेमडेसिव्हर/टॉसिलिझुमॅब

6. पायोनिर मेडिकल 3 रा मजला, आर्यन प्लाझा, आशोका मार्ग, नाशिक

शंकर हरवाणी रेमडेसिव्हर/टॉसिलिझुमॅब

7. जयराम मेडिकल, मुक्तीधाम रोड, नाशिकरोड, नाशिक आशिष जोशी

रेमडेसिव्हर/टॉसिलिझुमॅब

8. सहृदया हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, अशोका मार्ग, इंदिरानगर, नाशिक

रविंद्र हडवले रेमडेसिव्हर/टॉसिलिझुमॅब

9. हॉस्पिकेअर एजन्सी (Cipremi) रवि शंकर रोड, इंदिरानगर, नाशिक

श्री. पगारे रेमडेसिव्हर/टॉसिलिझुमॅब

10. भगवती डिस्ट्रीब्युटर्स सुर्योदय कॉलनी, सावता नगर नाशिक

राजेंद्र महाजन इटोलिझुमॅब

11 सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल वडाळा नाका, नाशिक

निलेश महाडिक रेमडेसिव्हर/टॉसिलिझुमॅब

12 चौधरी ॲण्ड कंपनी गोळे कॉलनी, अशोकस्तंभ, नाशिक

विरेन चौधरी रेमडेसिव्हर/टॉसिलिझुमॅब

13 कुचेरीया मेडीकल एजन्सी शांती माधव हाईटस, गोळे कॉलनी, नाशिक

महेश सुनिल जैन टॉसिलिझुमॅब/ रेमडेसिव्हर

14‍ शितल फार्मा जानकी प्लाझा, गोळे कॉलनी, नाशिक

सुरेश राधाकिसन नवनदर, टॉसिलिझुमॅब/ रेमडेसिव्हर

15 रूद्राक्ष फार्मा हेम वर्षा बिल्डिंग, गोळे कॉलनी, नाशिक

राजकुमार भालचंद्र कासार टॉसिलिझुमॅब/ रेमडेसिव्हर

16 पुनम एन्टरप्राईजेस गद्रे मंगल कार्यालय जवळ, गोळे कॉलनी, नाशिक

मेहुल चंद्रकांत शहा टॉसिलिझुमॅब/ रेमडेसिव्हर

17 महादेव एजन्सी गोळे कॉम्पलेक्स, गोळे कॉलनी, नाशिक

हेमराज धनराज पंजाबी टॉसिलिझुमॅब/ रेमडेसिव्हर

18 करवा फार्मासुटिकल्स केमिस्ट भवन, गोळे कॉलनी, नाशिक

अशोक ब्रिजल करवा टॉसिलिझुमॅब/ रेमडेसिव्हर

19 सरस्वती मेडिकल ॲन्ड जनरल स्टोअर्स जैन स्थानक, सटाणा रोड, मालेगांव

राजेंद्र गोविंद धनडे टॉसिलिझुमॅब/ रेमडेसिव्हर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com