Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशअयोध्येसह 46 रेल्वे स्थानके उडवण्याची तोयबाची धमकी

अयोध्येसह 46 रेल्वे स्थानके उडवण्याची तोयबाची धमकी

उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) प्रमुख रेल्वे स्थानकं उडवून देण्याची धमकी देणारं रेल्वे अधीक्षकांना (raily)मिळालं आहे. या पत्रावर लश्कर-ए-तोयबाचा (lashkar e taiba)उल्लेख आहे. यामुळे पोलिसांनी सर्व रेल्वे स्थानकांवर कसून तपासणी सुरु केली आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येसह 46 रेल्वे स्थानकं उडवून देणार असल्याचं त्यात म्हटलं आहे.

दिवाळी असल्यानं रेल्वे स्थानकांवरील गर्दी वाढली आहे. त्यामुळे अधिक काळजी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून घेतली जात आहेत.रेल्वे स्थानकं उडवून देण्याच्या धमकीचं पत्र लश्कर-ए-तोयबाच्या कमांडरने पाठवलेलं आहे. ज्यात रेल्वे स्थानकं उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. 26 नोव्हेंबरला रेल्वे स्थानक व 6 डिसेंबरला मंदिर उडवण्याची धमकी देणारे हे पत्र मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशातील सर्वच रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांच्या बरोबर पोलीस तैनात करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या