Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील अपेक्षित थंडी उधळली; किमान तापमानात होणार वाढ

राज्यातील अपेक्षित थंडी उधळली; किमान तापमानात होणार वाढ

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

पुढील ३ दिवस म्हणजे सोमवार दि.५ डिसेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात (maharashtra) किमान तापमानात (minimum temperature) सरासरीपेक्षा २ डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

ही तापमान वाढ कदाचित डिसेंबरचा पहिला आठवडा संपेपर्यंत म्हणजेच ७ ते ८ डिसेंबर पर्यन्तही जाणवू शकते. असा अंदाज पुणे वेधशाळेचे (Pune Observatory) निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Retired Meteorologist Manikrao Khule) यांनी वर्तविला आहे.

उत्तर भारतातील स्थिरावलेल्या किमान तापमानामुळे महाराष्ट्रात सुद्धा अपेक्षित असलेल्या किमान तापमानाच्या घसरणीला ब्रेक जाणवत आहे. महाराष्ट्रात कमाल तापमानात विशेष फरक जाणवण्याची शक्यता जाणवत नाही.शनिवारी (दि. ३) कोकण (Konkan) व मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण (Cloudy weather) जाणवेल,असेही त्यांनी सांगितले.

थंडीचे कमी प्रमाण म्हणजे रब्बी हंगामाला (rabbi season) फटका बसणार आहे. सध्या गहू (wheat), हरभरा (gram) पेरणी बरोबरच रब्बी कांदा (onion) व उन्हाळ कांदा (summer onion) लागवड सुरू आहे. थंडीचे प्रमाण कमी झाल्यास या पिकांना फटका बसणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये (farmers) नाराजी दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या