बिबट्याची कातडी विक्री करणारे ताब्यात

नाशिकसह इगतपुरी व ननाशी वनपरिक्षेत्राच्या पथकाची मोठी कामगिरी
बिबट्याची कातडी विक्री करणारे ताब्यात

इगतपुरी | वाल्मीक गवांदे Igatpuri

बिबट्याची कातडी (Leopard skin)विक्री करणार असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे इगतपुरी, नाशिक व ननाशी वनपरिक्षेत्राच्या पथकाने पुन्हा बनावट ग्राहक तयार करून संयुक्त सापळा रचत मोठी कामगिरी समोर आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील पेठ महामार्गावर ननाशी वनपरिक्षेत्रातील आंबेगण फाट्यावर दोन संशयित मोतीराम महादू खोसकर वय ३५, रा. आडगाव देवळा व सुभाष रामदास गुंबाडे वय ३५, रा. पाटे, तालुका पेठ यांना बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी रंगेहाथ ताब्यात घेतले. मात्र यात त्यांचा म्होरक्या कोण आहे हे दिसुन न आल्याने त्यांच्या म्होरक्याचा शोध वनविभागाकडून सुरु केला आहे.

मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस, वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव, पोपट डांगे, रुपेश दुसाने, वनरक्षक विठ्ठल गवांदे, गौरव गांगुर्डे, फैजल सैय्यद, मझहर शेख, गोरख बागुल, कैलास पोटींदे,

चिंतामण गाडर, शरद थोरात, राहुल घाटेसाव, उत्तम पाटील, विजय पाटील, प्रकाश साळुंखे, वाहन चालक नाना जगताप, मुज्जू शेख, सुनील खानझोडे आदींच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली आहे. संशयितांकडून बिबट्याची संपूर्ण कातडी जप्त करण्यात आली असुन पुढील तपास मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांच्या मार्गदर्शनाखाली ननाशीच्या वनपरिक्षेत्र आधिकारी सविता पाटील करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com