Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकादवा परिसरात बिबट्याचा संचार

कादवा परिसरात बिबट्याचा संचार

ओझे | वार्ताहर

दिंडोरी तालुक्यातील कादवा नदी परिसरामध्ये बिबट्याची दहशत पसरली असून शेतकरी, शेतमजुर वर्गासह करंजवण धरणवर रात्रपाळी करणा-यां कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

गेल्या चार वर्षापासून ओझे, करंजवण,लखमापूर, म्हेळूस्के , नळवाडी परिसरामध्ये बिबट्याचा संचार आहे. या बिबट्यांनी लहान बालकासह गायी, म्हैशी, शेळ्या, मेंढया, कुत्रे , मांजरे अशा अनेक प्राण्यावर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.

बिबट्याने आता आपला मोर्चा करंजवण धरणाकडे वळविला आहे. रोज रात्री धरणाच्या चौकी जवळ हा बिबट्या येत असल्यामुळे धरणाच्या देखरेखीसाठी असणारे कर्मचारी बाहेर येत नाहीत.

या परिसरामध्ये पाऊस असल्यामुळे या कर्मचारी वर्गाला एक- एक तासाला पाण्याची लेवल घ्यावी लागते. करंजवण धरण ८१% भरण्यामुळे येथील कर्मचारी वर्गाला धरणावर जागता पहारा द्यावा लागतो आहे.

मात्र या बिबट्यांच्या दहशतीमुळे येथील वातावरण भितीचे बनले आहे. त्या प्रमाणे ज्या-ज्या ठिकाणी शेतामध्ये बिबट्या दिसला त्या ठिकाणी शेतमजुर काम करण्यासाठी येत नाहीत.

कादवा परिसरामध्ये बारामाही नदीला पाणी व उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्यांचा याठिकाणी अधिवास आहे. हे बिबट्ये आता मानवी वस्तीवर गावा-गावात शिरत असल्यामुळे शेळ्या पाळणा-यां आदिवासी बांधवा मध्ये भिती पसरली आहे.

या दोन दिवसामध्ये नळवाडी येथे लोने वस्ती , करंजवण येथील पिंगळे वस्ती, करजवण धरण त्यांच प्रमाणे ओझे येथील गिते वस्ती येथे बिबट्याचा संचार आढळून आला आहे. वनविभागाने या परिसरामध्ये पिंजरा लावण्याची मागणी होते आहे.

करंजवण धरण ८१% भरले असून धरणक्षेत्रात बिबट्याचा वावर वाढला आहे. धरण सुरक्षितेवर परिणाम होत आहे. रात्रीच्या वेळी कर्मचारी वर्गामध्ये भिती निर्माण झाली असून वनविभाग दिडोरी यांना लेखी स्वरूपात कळविले आहे. वनविभागाने धरणक्षेत्रात त्वरित पिंजरा उपलबध करूण दयावा.

शुंभम भालके. (शाखा अभियंता करंजवण धरण)

- Advertisment -

ताज्या बातम्या