नाशिक l Nashik

इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव भटाटा या वाडीवर लोकवस्ती बिबट्याने एका घरात घेतला आश्रय घेतला आहे. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

इगतपुरी तालुक्यात पिंपळगाव भटाटा हा दुर्गम भाग आहे. या गावाची लोकसंख्या ११०० आहे. या गावात १७३ कुटुंब राहतात. मंगळवारी गिविंद हिंदोले यांच्या घरात बिबट्या घुसला. यामुळे घरातील मंडळी प्रचंड घाबरल्या.

या घटनेची माहिती त्वरित वनविभागास कळवण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.