त्र्यंबकच्या रस्त्यांवर बिबट्यांची लपाछपी

Representational Image
Representational Image

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwar

बिबट्याने (Leopard) नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून काल त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar taluka) धुमोडी (dhumodi) गावातील एका आठ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने हल्ला (Leopard attack) केल्याची घटना ताजी असतांनाच आता आसपासच्या गावातही नागरिकांना बिबट्याचा संचार होत असल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे (Talwade) गावात काल रात्रीच्या सुमारास नागरिकांना (citizens) बिबट्याचा संचार झाल्याचे निदर्शनास आल्याने या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. तसेच याच तालुक्यातील पहिने (pahine) फाटा परिसरातही काही नागरिकांना काल रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले असून तालुक्यातील,ब्राम्हणवाडे (Brahmanwade) कळमुस्ते (kalmuste) पिंपळद (pimplad) या भागातील अनेक शेतकऱ्यांना (farmer) बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, तालुक्यातील या सर्व ठिकाणी नागरिकांची नेहमी ये-जा सुरु असते. तसेच रात्रीच्या सुमारास कामावरून घरी जाणाऱ्या कामगारांची संख्याही बरीच असल्याने हे वर्दळीचे ठिकाण आहे. त्यामुळे या परीसरातील नागरिकांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने (forest department) पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com