रोटाव्हेटरमध्ये अडकल्याने दुर्मिळ कासव जखमी; नाशकात अडीच तास यशस्वी शस्रक्रिया

रोटाव्हेटरमध्ये अडकल्याने दुर्मिळ कासव जखमी; नाशकात अडीच तास यशस्वी शस्रक्रिया

नाशिक | Nashik

मखमलाबाद-मुंगसरा (Makhmlabad-Mungsara) मार्गावरील दरी मातोरी (Dari Matori) परिसरात ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये (Tractor) सापडल्याने पूर्ण वाढ झालेल्या दुर्मिळ कासव (A rare turtle) जखमी (Injured) झाले होते. संबंधित शेतकऱ्याने ही घटना नाशिक वनविभागाने (पश्चिम विभाग) यांना दिली. त्यांनतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत या कासवाला ताब्यात घेतले. यानंतर ईको-एको फौंडेशनचे (Eco Eco Foundation) सहकारी आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या कासवावर उपचार केले. सध्यस्थितीत कासवावर योग्य उपचार करण्यात आले आहेत....

अधिक माहिती अशी की, 23 जुलै रोजी दरी मातोरी (Dari Matori) परिसरात एक शेतकरी शेतीची मशागत करत होते. याच वेळी दुर्मिळ श्रेणीतील कासव मातीखाली होते. यानंतर ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये हे कासव अडकले.

या घटनेत कासवाचे कवच फुटले. यानंतर हे कासव इको इको फाउंडेशनकडे उपचार आणि पुनर्वसनासाठी सुपूर्द करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी सचिन वेंदे आणि डॉ संदिप पवार यांनी जखमीवर तब्बल दोन तास यशस्वी शस्त्रक्रिया केली. कासवाची तब्बेत स्थिर आहे आणि उपचारांना त्याने चांगला प्रतिसाद दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

धोक्यात असलेल्या प्रजाती

इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या (International union for conservation of nature) धोक्यात असलेल्या प्रजातींची यादी ही जगातील जैवविविधता सांभाळण्याचा महत्त्वपूर्ण घटक आहे. प्रजातींची यादी आणि त्यांची स्थिती बघता जैवविविधता संवर्धन आणि धोरणातील बदलासाठी कृती करण्याची गरज आहे. यादी नऊ श्रेणींमध्ये प्रजातींची विभागणी करते: मूल्यमापन न केलेले, डेटाची कमतरता, किमान चिंताजनक, जवळपास धोक्यात, असुरक्षित, धोक्यात, गंभीरपणे धोक्यात, जंगलातील नामशेष आणि नामशेष. एक IUCN रेड लिस्ट क्रिटली एन्डेंजर्ड प्रजाती म्हणजे जंगलात नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली प्रजाती होय.

पावसाळ्यात, मादी कासव सहसा अंडी घालण्यासाठी बाहेर पडतात. शेतात प्रवेश करण्यासाठी रस्ता ओलांडतात. ही कासवे सहसा नदीकाठी दिसतात. सरपटणारे प्राणी दुर्मिळ श्रेणीत असले तरी नाशिक जिल्ह्यात या प्रजातींची संख्या अधिक आहे. तसेच, ते रात्री बाहेर पडतात. त्यामुळे असे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी वेग मर्यादेत वाहन चालवावे. -वैभव भोगले, वन्यजीव वॉर्डन आणि इको इको फाउंडेशनचे सदस्य

वैभव भोगले, वन्यजीव वॉर्डन आणि इको इको फाउंडेशनचे सदस्य

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com