
मुंबई | Mumbai
काही दिवसांपूर्वी शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रतेच्या ( MLA Disqualification) सुनावणीचे वेळापत्रक ठरले आहे. त्यानुसार १३ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर युक्तिवाद चालणार आहे. त्यानंतर आता शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी विधीमंडळाच्या कार्यवाहीला वेग आला असून विधीमंडळाच्या सचिवांनी दोन्ही गटांना योग्य पुरावे सादर करा, असे म्हणत शिंदे-ठाकरेंना (Shinde-Thackeray) नोटीस बजावली आहे.
शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांना विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचे पुढील वेळापत्रक (Schedule) ईमेल द्वारे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही गटांना आपले वर्चस्व सिद्ध करण्याची संधी आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयानंतर आता विधीमंडळाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात मंगळवारी शिंदे-ठाकरेंना दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आता शिंदे-ठाकरेंना उत्तर देण्यासाठी आठ दिवसांची मुदत शिल्लक आहे. त्यामुळे आता शिवसेना कुणाची? हे ठरवण्यासाठी दोन्ही गटांना आठ दिवसांत योग्य पुरावे सादर करावे लागणार आहेत.