Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याहिवाळी अधिवेशनाचा अखेरचा आठवडा; राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

हिवाळी अधिवेशनाचा अखेरचा आठवडा; राज्यपालांच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई | Mumbai

विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा आणि अंतिम आठवडा. विधीमंडळामध्ये कायदा सुव्यवस्था यावर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे….

- Advertisement -

तसेच विधानसभा अध्यक्षपद निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार का? याबाबतदेखील महत्वपूर्ण निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी घेणार आहेत. त्यांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

राज्यपाल कोश्यारी अध्यक्ष पदाचा निवडणूक प्रस्तावावर सही करून विधीमंडळाकडे पाठवतात का? याकडे सभागृहाच्या नजरा खिळल्या आहेत. महाविकास आघाडी प्रमुख नेत्यांनी काल राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती.

भाजपाचे बारा निलंबित आमदारकी मागे घेणे त्याचवेळी अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणे यासाठी महाविकास आघाडी नेते आणि भाजपा नेते यांच्यात राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.

अरबी समुद्रात शिवाजी महाराज स्मारक यावर लक्षवेधी – तसच अंतिम आठवडा प्रस्ताव राज्यातील कायदा सुव्यवस्था प्रश्न गुन्हेगारी , माजी मंत्री संजय राठोड यांचे पूजा चव्हाण प्रकरणात नाव यासह अनेक मु्ददे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर बोलण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या