करोनाग्रस्तांच्या जमिनीवर डल्ला मारू पाहणाऱ्यांना लगाम; काय म्हणाल्या डॉ नीलम गोऱ्हे?

करोनाग्रस्तांच्या जमिनीवर डल्ला मारू पाहणाऱ्यांना लगाम; काय म्हणाल्या डॉ नीलम गोऱ्हे?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या दीड वर्षांत करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या साडेआठ हजार जणांच्या स्थावर मालमत्तेवर इतर कुणीही डल्ला मारू नये म्हणून त्यांच्या मालमत्तेवर वारसांची नोंद तातडीने करून घेण्याचे निर्देश देण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे (Legislative assembly Council Deputy speaker Dr Nilam gorhe) यांनी प्रशासनाला केल्या...

करोनामुक्त गावांचा आढावा (Review about non covid villages) घेण्यासाठी आज डॉ गोऱ्हे (Dr Nilam Gorhe) नाशिक दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकारी व करोनामुक्त गावांचे सरपंच यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की लातूरच्या भुकंपानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ज्याप्रमाणे तेथील स्थावर मालमत्तेला तीन वर्षे खरेदी विक्रीवर निर्बंध आणले होते. तसेच निर्बंध आता करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या स्थावर मालमत्तेबाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. (Death due to Covid in nashik district)

त्याबाबत शासनाला शासनाला प्रस्ताव पाठवणार आहोत. तत्पूर्वी जे बालक निराधार झाले आहेत, त्यांच्या आईवडिलांच्या संपत्तीवर इतर कुणाचे नाव लागू नये यासाठी मंडळअधिकरी तलाठी यांना दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत साडेआठशे जणांची नोंद झालेली आहे. त्यात २४ बालक पूर्णपणे निराधार आहेत, अजून ३ हजार बालक निराधार राहण्याची शक्यता आहे. त्यांचा ही शोध घेण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com