अमिताभ बच्चनने का मागितली सचिनची माफी?जाणून घ्या कारण

अमिताभ बच्चनने का मागितली सचिनची माफी?जाणून घ्या कारण
अमिताभ-सचिन

बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)नेहमी टि्वट करत असतात. आता ते पुन्हा एका टि्वटमुळे चर्चेत आले आहेत. महान खेळाडू सचिन तेंडुलकरबाबत (sachin tendulkar)चुकीच ट्विट केल्यानंतर अमिताभ चर्चेत आला. या चुकीच्या ट्विटनंतर अमिताभ (Amitabh Bachchan)यांनी माफी मागितली आहे.

अमिताभ-सचिन
श्वेता तिवारीच्या साडीवरील फोटोंवर चाहते म्हणाले...

अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडियोत सचिन तेंडुलकर जगभरातील माजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या 'लिजेंड्स लीग क्रिकेट'मध्ये सहभागी झाला होता, असं म्हटलं होतं. मात्र हे सत्य नव्हतं. यानंतर लगेच एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने शनिवारी स्पष्ट केलं की, सचिन तेंडुलकर येणाऱ्या 'लिजेंड्स लीग क्रिकेट'चा (LLC) भाग नाही. LLC ही निवृत्त खेळाडूंसाठी एक क्रिकेट लीग आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या ट्विटनंतर सचिन तेंडुलकरचं काम सांभाळणाऱ्या एसआरटी स्पोर्ट्सच्या प्रवक्त्याने लीगमधील सचिनचा सहभाग नसल्याचं स्पष्ट केले.

अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

यानंतर तातडीने अमिताभ बच्चन यांनी ट्विट डिलीट करून एक नवा व्हिडिओ पोस्ट केला, "चूक सुधार: लेजेंड्स लीग क्रिकेट टी20' अंतिम प्रोमो. माझ्यामुळे कोणाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो आणि खेद व्यक्त करतो. नकळत चूक झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com