
देशदूत । चमू
नाशिक जिल्ह्यात अवकाळी, गारपीट आणि वादळाने कहर केल्यानंतर पिकांचे, घरांचे मोठे नुकसान ग्रामीण भागात झाले. मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौर्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट शेतकर्यांच्या बांधावर जावून नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आज ठिकठिकाणी पाहणी दौरे केले. त्यामुळे आज पाहणींचे पेव आले होते. यामुळे शेतकर्यांना भरपाई मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र अद्यापही बर्याच भागात शासनाकडू नुकसानीचे पंचनामे झाले नसल्याने नासाडी झालेल्या पिकांची कुजून विल्हेवाट लागली जात आहे.
आंबा बागेचे नुकसान
सुरगाणा । काल दुपारी तीन वाजेच्या सुमारास पिंपळसोंड, उंबरपाडा, मालगोंदे, खुंटविहिर या परिसरातील गावांमध्ये जोरदार चक्रीवादळाचा फटका बसल्याने उंबरपाडा (पि) येथील शिवराम चौधरी, काशिराम चौधरी यांच्या घरावरील सिमेंट पत्रे, कौले फुटून नुकसान झाले आहे.
पिंपळसोंड व उंबरपाडा (पि), खुंटविहिर, मालगोंदे येथील शिवराम चौधरी, मोतीराम चौधरी, रंगू चौधरी, मणिराम चौधरी, लहानू चौधरी, रतिलाल चौधरी यांच्यासह परिसरातल गावांमध्ये आंबा फळ बागेचे नुकसान झाले आहे. अळीवपाडा येथील लहानीबाई मोकाशे यांच्या घरावरील पत्रे पत्रे उडाली आहेत. शेतातील आंबा पिकाचे पडझड झाली आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
भरपाई द्या : गावित
ठाणापाडा । गेल्या दोन तीन दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळ झाल्याने ठिकठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्वरीत पंचनामे करुन भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी सभापती इंद्रजित गावीत यांनी तहसीलदार भोकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
बोरगाव घाटमाथ्यावर व सुरगाणा, कळवण, भागात स्टॉबेरी, कांदे, घेवडा, टोमॅटो वालपापडी, मिरची, अशा बागायती बरोबर गहू, हरभरा, मसुर, वाटाणा,या धाण्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे ठिकठिकाणी चित्र डोळ्यासमोर बघायला मिळतात. हवामान खात्याने दर्शविले तारखेला पाऊस पडल्याने काही शेतकरी सतर्क राहून पिके झाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तारांबळ व धडपड सुरू आहे.
फळांच्या पिकांबरोबरच आंब्याचे सुध्दा नुकसान झाले आहे, यंदा आंब्याचे भाव गगनाला भिडणार असल्याचे दिसून येते आहे.अवकाळीने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यांची त्वरीत पाहणी करून नुकसान पंचनामे करुन नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी माजी सभापती इंद्रजित गावीत यांनी तहसीलदार भोकरे यांना दिले आहे. यावेळी डीवाय एफवाय तालुका अध्यक्ष नितीन पवार, अशोक धुम, मोहन पवार, पांडुरंग गायकवाड आदी उपस्थित होते.
पंचनामे करा : आ. पवार
वांगणसुळे । गारपीट व अवकाळी पाऊस वादळी वार्यामुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील सर्वच शेतकर्यांना भरीव मदत राज्य शासनातर्फे दिली जाईल. आपण स्वतः शेतकरी असल्याने शेतकर्यांच्या अडीअडचणीची पूर्ण जाणीव आहे त्यामुळे बाधित शेतकर्यांना लवकरच मदत दिली जाईल अशी नि:संदिग्ध ग्वाही देत आमदार नितीन पवार यांनी तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने करून शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासन यंत्रणेतील अधिकार्यांना दिले.सुरगाणा तालुक्यात गत काही दिवसापासून अवकाळी पावसासह गारांचा वर्षा व होत असल्याने पिकांची तसेच घराची अतोनात हानी आहे. या पार्श्वभूमीवर आमदार पवार सुरगाणा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी थेट शेतकर्यांच्या दारावर पोहोचले.
सुरगाणा तालुक्यात सोमवारी 10 एप्रिल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या वादळी वार्यासह अवकाळी पावसामुळे तालुक्यातील 80 ते 85 घरांचे पत्रे व कौले उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने आमदार नितीन पवार यांनी स्वतः जाऊन पाहणी केली. संबंधित विभागाच्या अधिकार्यांना तात्काळ पंचनामे करावे अशा सूचना दिल्या.
तालुक्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी वार्यासह अर्धा तास पावसामुळे खोकरी ग्रामपंचायत अंतर्गत खोकरी, युवराजवाडी, निंबारपाडा, पातळी, जामुनमाथा, भिंतघर, चावडीचापाडा, साबरदरा, बिवळ, धामणकुंड, लहान घोडी, मोठी घोडी, वडमाळ, वावरपाडा, गळवड, माणी, भदर या गावात 80 ते 85 घरांचे पत्रे व कौले उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी यांनी तात्काळ पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पवार, सामाजिक कार्यकर्ते कैलास चौधरी, देविदास पवार, नाना पवार, किरण चौधरी, संपत मोरे, नितीन चौधरी, हेमंत भुसारे, हेमंत मोरे, भागवत ठाकरे उपस्थित होते.
महालेंकडून पाहणी
पेठ । अवकाळी पावसाने व जोरदार वार्यासह गारपीट सुरु झाल्याने कोहोर, घनशेत, कुळवंडी, पळशी बु॥, शेवखंडी, गावंध, आमलाण, अभेटी आदी परिसरात प्रचंड उष्मा जाणवत असतांनाच 4 वाजेनंतर सुरु झालेल्या अवकाळी पावसाने जनजिवन विस्कळीत झाले. जोरदार वार्यामुळे गावंध (बर्डापाडा) परिसरातील ज्ञानेश्वर जयराम भोये यांच्या पोल्ट्रीतील शेड उध्वस्त होऊन 9000 पक्षी मृत झाले. मंगेश चंदर इम्पाळ यांचीही पोल्ट्रीची तशीच अवस्था होऊन तेथील 4500 पक्षी मृत झाले.
अनेक घरांची पत्रे , कौले उडून संसारपयोगी साही त्याची नुकसान झाले. उपविभागीय अधिकारी, तहसिलदार संदीप भोसले, तलाठी यांनी घटनास्थळी भेटी देऊन नुकसानीची पाहाणी करूण शासनास अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. या अस्मानी संकटात प्रशासनाकडून तातडीची मदत उपलब्ध होण्यासाठी युवा नेते गोकुळ झिरवाळ आपल्या सहकार्या समवेत बधीत गावांना भेटी देण्यात आल्या. भाजपच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अवकाळी पावसाने बधीत गावांची नुकसानीची पाहाणी शिंदे गटाचे माजी आमदार धनराज महाले, माजी पं . स . सभापती अंबादास चौरे, नंदू गवळी आदींनी पाहणी करुन त्वरीत भरपाई देण्याची मागणी केली.
केंद्रिय राज्यमंत्र्यांकडून पाहणी
चांदोरी । अवकाळी पावसाने रविवारी (ता.9) सायंकाळी चांदोरीसह परिसरात झोडपले असून, गारपीटदेखील झाली आहे. यामुळे चांदोरी शिवार, सायखेडा, खेरवाडी, चितेगाव या भागात शेतकर्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी बुधवारी (दि. 12) सायंकाळी उशिरा भेट दिली.
येथील संजय भोज, प्रवीण कोरडे यांच्या द्राक्षबागेची पाहणी करीत नुकसानीची माहिती घेतली. वादळाने पडलेल्या मुरलीधर कोरडे यांच्या घराला भेट देत जखमी सार्थकची चौकशी केली. मंत्री भारती पवार यांच्यासोबत प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे उपस्थित असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळेल, अशी आशा आहे. निफाड तालुक्यात 45 दिवसांत तिसर्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान, डॉ भारती पवार यांच्यासमवेत भाजप विधानसभा अध्यक्ष यतीन कदम, तालुकाध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते, सारिका डेर्ले, विलास मत्सागर, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, सरपंच विनायक खरात, माजी उपसरपंच संदीप टर्ले, प्रकाश ढेमसे, सोमनाथ खालकर, सोमनाथ बस्ते, भाऊसाहेब खर्डे, संदीप गडाख, ग्रामविकास अधिकारी सुरेश भांबारे आदी उपस्थित होते.