Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यालोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) हे लोकसभा निवडणुकीवेळी भाजपात जातील. तसेच १५ दिवसांच्या आत ठाकरे गटातील अनेक आमदार शिवसेनेत येतील असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे…

- Advertisement -

Nashik : उकळत्या तेलाच्या कढईत पडल्याने
सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

यावेळी शिरसाट म्हणाले की, “काँग्रेसमध्ये (Congress) एकवाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचे जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचेही जमत नाही. त्यामुळे अनेक दिवसांच्या घडामोडीवरून मला तरी असं वाटतं की, अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपात जातील. कारण एवढ्या मोठ्या नेत्याला तिथे योग्य वागणूक मिळत नाही, असे दिसत आहे” असा दावा त्यांनी केला.

नाशिकहून सुरतला जाणारे कॉंग्रेस कार्यकर्ते गुजरात पोलिसांच्या ताब्यात

ते पुढे म्हणाले की, “अशोक चव्हाण भाजपात जातील असेच प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक घडामोडी घडल्या आहेत. बाळासाहेब थोरात भाजपात जाणार नाहीत, कारण राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे विळ्या-भोपळ्याचे नाते आहे.” असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदींच्या डिग्रीवरुन सुरु असलेल्या वादावर अजित पवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले…

तसेच काल महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. यावरुन राजकीय चर्चा सुरू आहेत. त्यावरूनही आमदार शिरसाट यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, काल झालेली सभा वज्रमुठ सभा नव्हती. नाना पटोले काल आजारी होते म्हणून आले नाहीत असे सांगत आहेत मग आज ते सुरतला न्यायालयात कसे गेले यावरुन महाविकास आघाडीत काय सुरू आहे ते दिसत असल्याचे शिरसाट म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या