नेट झिरो इंडिया सायकल मोहिमेस प्रारंभ

नेट झिरो इंडिया सायकल मोहिमेस प्रारंभ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती Mahatma Gandhi Jayanti निमित्त व आजादी का अमृत महोत्सव निमित्त पर्यावरण संवर्धनासाठी नाशिक सायकलिस्टस फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेली नाशिक ते मुंबई नेट झिरो इंडिया सायकल मोहीम काल सायंकाळी गेटवे ऑफ इंडिया येथे पोहचली. आज सकाळी सात वाजता गेट ऑफ इंडिया Gate Way Of India येथून नेट झिरो इंडिया Net Zero India या सायकल मोहिमेचा Cycle Rally प्रारंभ झाला. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे Nashik Cyclists Foundation संस्थापक सदस्य पर्यावरण प्रेमी किरण चव्हाण यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या सायकल प्रबोधन राईडला सुरुवात झाली.

सध्याच्या वातावरणात हरितगृह वायूचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे. वातावरणात मोठे बदल घडत आहे प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य समजून हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने दैनंदिन जीवनात वाहतुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर किमान आठवड्यातून एकदा, नाही जमल्यास महिन्यातून एकदा तरी करावा तसेच चार चाकी वाहन किंवा मोटर सायकल पेक्षा इलेक्ट्रिक बाईक चा वापर करावा जेणेकरून पर्यावरणाची होणारी हानी टळेल या दृष्टीने नेट झिरो इंडिया हे मिशन हाती घेऊन नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने राज्याचे पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरेMinister of Environment Aditya Thackeray यांना निवेदन देण्यासाठी गांधी जयंतीचे औचित्य साधले व सायकलिस्टस मुंबईला सायकलवर पोहचले.

ही सायकल राईड नागरीकांशी संवाद साधत गेट वे ऑफ इंडिया येथून मंत्रालय - नरिमन पॉईंट - मरीन ड्राईव्ह- गिरगाव चौपाटी मार्गस्थ होऊन मलबार हिल येथील वर्षा बंगल्यावर पर्यावरण मंत्री मा. आदित्य ठाकरे यांची भेट घेण्यास पोहचली. वर्षा बंगल्यावर पोहोचताच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वतः येऊन सर्व नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशन टीमचे स्वागत व आदरातिथ्य केले.

तसेच नाशिक येथून सायकलवर पर्यावरण संवर्धनासाठी चांगली मोहीम हाती घेऊन आल्याचे विशेष कौतुक केले.2012 पासून नाशिक सायकलिस्टस फाऊंडेशनचे संस्थापक मा. हरीषजी बैजल सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विविध सायकल उपक्रमांची माहिती अध्यक्ष राजेंद्र वानखेडे सर यांनी दिली. पर्यावरण मंत्री मा.आदीत्य ठाकरे यांना नाशिक सायकलिस्टस तर्फे विशेष सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. नेट झीरो इंडिया या चळवळीचे निवेदन देण्यात आले.

पर्यावरण मंत्र्यांनी देखील या मोहिमेचे कौतुक करत सर्व सायकलिस्टचे अभिनंदन केले व सर्व सायकलिंस्टशी अर्धा तास संवाद साधला. नाशिक मध्ये कुठे सायकल ट्रॅक करता येतील या बद्दल विचारणा केली व प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.विदेशा प्रमाणे आपल्या राज्यात अद्यावत सायकल ट्रक ,सायकल पार्किंगचे स्टेशन, कामासाठी सायकल वर आल्यास फ्रेश होण्यासाठी शाॅवर या सर्व सुविधा असल्यास नागरिक सायकलचा वापर मोठ्या प्रमाणात करतील व सायकलची प्रतिष्ठा वाढेल . निश्चितच कोव्हीडच्या काळात जास्तीत जास्त सायकलचा सेल वाढला. लवकरच नाशिक मधे सायकलिंगला येऊन सायकल ट्रॅक साठी पाहणी करण्याचे आश्वासन दिले.

या राईडला मुंबई येथे रहिवासी असलेले नाशिक सायकलिस्टसचे दिव्यांग सायकलिस्टस मेंबर टॅन्डम सायकलवर सहभागी झाले.

या राईड मध्ये राजेंद्र वानखेडे, चंद्रकांत नाईक, रवींद्र दुसाने, डॉ.मनिषा रौदळ, राजेश्वर सूर्यवंशी, नलिनी कड, प्रवीण कोकाटे, अविनाश लोखंडे, माधुरी गडाख ,दविंदर भेला, मोहन देसाई गणेश माळी, साधना दुसाने, वैशाली शेलार ,रियाज अंसारी, निरंजन जोशी, ऋतुराज वाघ, आनंद गायधनी, , किशोर काळे , मिलिंद इंगळे, ऐश्वर्या वाघ , सुरेश डोंगरे, चिन्मयी शेलार ,भक्ती दुसाने हे सायकलीस्ट स सहभागी झाले

Related Stories

No stories found.