'राष्ट्रीय सिकल सेल अ‍ॅनिमिया निर्मूलन मिशन 2047' चा शुभारंभ

काँग्रेसची गॅरंटी म्हणजे नीयत में खोट - पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
'राष्ट्रीय सिकल सेल अ‍ॅनिमिया निर्मूलन मिशन 2047' चा शुभारंभ

शहडोल । वृत्तसंस्था Shahdol

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहडोलमधील लालपूर येथे राष्ट्रीय सिकल सेल अ‍ॅनिमिया निर्मूलन मिशन 2047 लाँच केले. यासोबतच एका क्लिकवर 3.5 कोटी लाभार्थ्यांना डिजिटल आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल करत खोटी गॅरंटी देणार्‍यांपासून सावध राहा, असे सांगितले. काँग्रेसची गॅरंटी म्हणजे नीयत में खोट आणि गरिबांना दुखापत, असे ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देश एक मोठा संकल्प घेत आहे. आदिवासी बांधवांचे जीवन सुरक्षित करण्याचा हा संकल्प आहे.सिकलसेल अ‍ॅनिमियापासून वाचवण्याची ही प्रतिज्ञा आहे. दरवर्षी सिकलसेल अ‍ॅनिमियाच्या विळख्यात येणार्‍या अडीच लाख मुलांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचवण्याचा हा संकल्प आहे.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, सिकलसेल अ‍ॅनिमिया सारखा आजार खूप वेदनादायक असतो. हा आजार कुटुंबांनाही विखुरतो. हा आजार पाण्याने पसरत नाही, हवा किंवा अन्नानेही पसरत नाही. हा आजार अनुवांशिक आहे, याचा अर्थ हा आजार फक्त पालकांकडूनच मुलामध्ये येतो. संपूर्ण जगात 'सिकल सेल अ‍ॅनिमिया'च्या निम्म्या केसेस एकट्या आपल्या देशात आहेत. पण गेल्या 70 वर्षात त्याची कधीच काळजी केली गेली नव्हती हे दुर्दैव आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी कोणतीही ठोस योजना आखण्यात आली नाही असे सांगत काँग्रेसवर हल्लाबोल करतांना मोदी म्हणाले की,ज्यांच्याकडे स्वतःची कोणतीही गॅरंटी नाही, ते गॅरंटीसह नवीन योजना आणत आहेत.त्यांच्या गॅरंटीत लपलेले खोटे ओळखा.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

खोट्या गॅरंटीच्या नावाखाली लपलेला फसवेपणा ओळखा. जेव्हा ते मोफत विजेची हमी देतात, याचा अर्थ ते विजेचे दर वाढवणार आहेत. जेव्हा मोफत प्रवासाची हमी दिली जाते, तेव्हा त्याचा अर्थ वाहतूक व्यवस्था उद्ध्वस्त होणार आहे. मात्र आदिवासी समाजाचे हे सर्वात मोठे आव्हान सोडविण्याचे काम आता आपल्या सरकारने हाती घेतले आहे. आपल्यासाठी आदिवासी समाज हा केवळ सरकारी व्यक्ती नसून आपल्यासाठी संवेदनशीलतेचा विषय आहे, भावनिक बाब आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com