ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाला आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कारजाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणार्‍या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत पुरस्काराच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे, तसेच पुरस्कारांच्या क्षेत्रांमध्येही विस्तार करण्यात आल्याचे समाधान असून राज्याचे सांस्कृतिक क्षेत्र संपन्न व्हावे यासाठी तत्पर असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुरस्काराची घोषणा करतांना दिली.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com