Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यागानकोकिळा लता दिदींचे स्वप्न होणार साकार

गानकोकिळा लता दिदींचे स्वप्न होणार साकार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गानकोकिळा लता मंगेशकर (Late.Lata Mangeshkar )यांनी हयातीत वेगवेगळे सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.दिदींची हेल्थ सेंटर,रुग्णालय निर्मितीची स्वप्नपूर्ती प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यभूमीमध्ये लवकरच आकाराला येणार आहे. नाशिक तालुक्यातील तिरडशेत येथे लता दिदींच्या नावाने या हेल्थ सेंटरची ( Health Center)निर्मिती गोरगरीबांसाठी केली जाणार आहे.

- Advertisement -

या आश्रमाकरिता आवश्यक लागणारी जागा शासनाकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. लतादिदींच्या भगिनी उषा मंगेशकर यांनी जागा मागणीचा प्रस्ताव नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केलेला आहे. त्यानुसार आता तिरडशेत येथे जागा निश्चित करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेकरिता लवकरच शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

लतादीदींनी आपल्या हयातीत वेगवेगळे सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांचे सामाजिक योगदान नेहमीच चर्चिला जाणारा विषय आहे. आता त्यांच्या नाशिकमध्ये एका हेल्थ सेंटरची निर्मिती केली जाणार आहे. वृद्ध नागरिक,कलाकार आणि गोरगरीब जनतेसाठी सुसज्ज असे हेल्थ सेंटर नाशिकमध्ये असावे, हे त्यांचे स्वप्न आता साकार होणार आहे. या हेल्थसेंटरसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने आडगाव शिवारातील पाच एकर जागा देण्यासाठीचा प्रस्ताव गेल्या वर्षी विभागीय आयुक्तांमार्फत शासनास पाठवला होता. या प्रस्तावावर निर्णय होण्याअगोदरच सुचवलेल्या जागेतुन सुरत-चैन्नई महामार्ग जात असल्याने नव्या जागेचा प्रस्ताव पाठवण्याचे सांगण्यात आले होते.

यासाठी लता मंगेशकर यांच्या ‘स्वरमाऊली फाऊंडेशन’ संस्थेचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तिरडशेत येथील गट नं.19 मधील शासकीय जागा सुचवली होती. या जागेची पहाणी करण्यासाठी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर या नाशिक येथे आल्या होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे,नाशिक तहसिलदार अनिल दौंडे आणि तहसिलदार राजेंद्र नजन यांनी जागा दाखवत त्याचा अहवाल आता शासनाकडे सादर करण्याची तयारी सुरु केली आहे.

वृद्धालयाऐवजी हेल्थसेंटर

स्वरमाऊली फाउंडेशनच्या प्रस्तावित वृद्धालयाकरिता जागेचा प्रस्ताव संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मयुरेश पै आणि ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर ह्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागील वर्षी सादर केला होता.मात्र, या जागेतून सुरत-चैन्नई महामार्ग जात असल्याने दुसर्‍या जागेचा प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले. नव्याने हा प्रस्ताव सादर करतांना वृद्धालयाऐवजी हेल्थसेंटरची निर्मिती करण्यासाठी जागा मिळावी, असा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यानुसार नाशिक जवळील तिरडशेत येथे जागा देण्याचा विचार केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या