
नवी दिल्ली
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण (Solar Eclipse ) 4 डिसेंबर (शनिवार) रोजी होणार आहे. 15 दिवसांच्या काळात हे दुसरे ग्रहण आहे. यापुर्वी १९ नोव्हेंबर रोजी चंद्रग्रहण (moon eclipse)झाले होते.
हिंदू पंचांगानुसार हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी आहे. जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि पृथ्वीवर त्याच्या सावलीचा सर्वात गडद भाग पडतो तेव्हा हे संपूर्ण सूर्यग्रहण (Solar Eclipse )होते. सूर्यग्रहणाची (Solar Eclipse )वेळ सकाळी 10:59 पासून सुरू होईल आणि दुपारी 3:07 पर्यंत राहील. अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अमेरिकामध्ये हे सूर्यग्रहण (Solar Eclipse )दिसणार आहे. सूर्यग्रहण (Solar Eclipse )भारतात दिसणार नाही. 01 वाजून 57 मिनटांनी हा ग्रहण पूर्ण चंद्रमाच्या छायेत राहणार आहे. यामुळे दिवस असूनही यावेळी आंधार राहणार आहे.
2021 चे दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. परंतु तुम्ही हे सूर्यग्रहण थेट लाइव्ह ऑनलाइन पाहू शकता.