Chandra Grahan 2022 : आज वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण, कधी आणि कुठे पाहाल?

Chandra Grahan 2022 : आज वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण, कधी आणि कुठे पाहाल?

मुंबई | Mumbai

या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज (८ नोव्हेंबर) रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण संपू्र्ण भारतातून (Lunar Eclipse 2022 in Maharashtra) पाहता येणार आहे.

हे चंद्रग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असेल परंतु भारतात (Lunar Eclipse 2022 in India) चंद्रोदय उशीरा होणार (Chandra Grahan 2022 Time in Maharashtra) असल्याने देशाच्या काही भागातूनच संपूर्ण चंद्रग्रह दिसेल.

देशाच्या पूर्वेत्तर भागात चंद्रोदय लवकर होईल त्यामुळे या भागांत ९८ टक्के चंद्रग्रहण (Chandra Grahan 2022 Time in India) पाहता येईल. या ठिकाणी चंद्रग्रहण दिसण्याचा कालावधी ३ तासांचा असेल. परंतु पश्चिमेकडी भागात हे चंद्रग्रहण केवळ १ तास १५ मिनिटे पाहता येईल. या ठिकाणी संपूर्ण चंद्रग्रहण दिसणार नाही, ते अंशिक दिसेल.

देशाच्या पूर्वेकडील कोलकाता आणि गुवाहाटी शहरात चंद्रोदयाच्या वेळी ग्रहणाचा पूर्ण टप्पा सुरू होणार आहे. कोलकातामध्ये चंद्रोदयाच्या वेळेपासून पूर्ण टप्पा संपेपर्यंतचा कालावधी २० मिनिटांचा असेल आणि चंद्रोदयाच्या वेळेपासून ग्रहणाचा आंशिक टप्पा संपेपर्यंतचा कालावधी १ तास २७ मिनिटांचा काळ असेल.

गुवाहाटीमध्ये, चंद्रोदयाच्या वेळेपासून पूर्ण टप्प्याच्या समाप्तीपर्यंतचा कालावधी ३८ मिनिटांचा असेल, तर तेथे चंद्रोदयाच्या वेळेपासून ग्रहणाचा आंशिक टप्पा संपेपर्यंतचा कालावधी १ तास ४५ मिनिटांचा काळ असेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com