Thursday, April 25, 2024
Homeनाशिकलासलगावला कांदा भावात चौदाशे रुपयांची घसरण

लासलगावला कांदा भावात चौदाशे रुपयांची घसरण

लासलगाव। Lasalgaon (वार्ताहर)

गत दोन आठवड्यात उन्हाळ कांद्याच्या भावात कमीत कमी 800 रु. तर जास्तीत जास्त 1800 रु. तर लाल कांद्याच्या भावात जास्तीत जास्त 1480 रु. ते सरासरी 1300 रु. इतकी नीचांकी घसरण झाली. कांद्याचे दररोजचे कोसळते दर कांदा उत्पादक शेतकर्‍यांची चिंता वाढवणारे ठरू लागले आहेत.

- Advertisement -

कांदा भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी, व्यापार्‍यांवर आयकरमार्फत धाडी तसेच परदेशातून कांदा आयात केल्याने दोन आठवड्यांपूर्वी 5 हजार रु. प्रतिक्विंटलने विकणारा कांदा आज 2500 रु. ते 3000 रु. प्रतिक्विंटलने विकला जाऊ लागला आहे.

तीन आठवड्यांपूर्वीचा विचार करता उन्हाळ कांद्याच्या किमान भावात 300 रु. कमाल 2500 रु. तर सरासरी 2000 रु. इतकी तसेच लाल कांदा कमाल 1480 रु. तर सरासरी 1300 रुपयांची घसरण झाली आहे. कांद्याने मागील काही महिन्यांपासून उच्चांक गाठला होता. त्यामुळे सर्वसामान्यांना कांद्याने चांगलेच रडवले होते.

शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या कांद्याचे दर आता कोसळले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला तर उत्पादक शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. भारतीय बाजारात इजिप्त आणि तुर्कस्तानाच्या कांद्याची आवक झाली असून कांद्याची आवक वाढल्याने कांदा बाजारभावात घसरण झाली आहे.

असे असतानाही ग्राहकांकडून विदेशी कांद्यापेक्षा भारतीय कांदा खरेदीला पसंती दिली जात आहे. सद्यस्थितीत डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात कांद्याची आवक वाढल्याने दरदेखील कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांची कांदा खरेदी करण्याची क्षमता वाढल्याचे दिसून आले. इजिप्त आणि तुर्कस्तानवरून आलेल्या कांद्याचे दर 25 रु. ते 35 रु. किलोवर आहेत. त्यामुळे भारतीय कांद्याचे दर कमी झाले असल्याचे समजते.

कांद्याचे कोसळते बाजारभाव शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी ठरू पाहत असून शासनाने कांदा निर्यात मूल्य शून्य करून कांदा निर्यातीला चालना द्यावी, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी, शेतमजूर व व्यावसायिकांकडून होऊ लागल्याने शासनाने शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

उन्हाळ कांद्याची झालेली घसरण

किमान कमाल सरासरी

23 नोव्हेंबर 1200 4400 3400

30 नोव्हेंबर 901 3299 2551

7 डिसेंबर 900 1900 1450

लाल कांदा

23 नोव्हेंबर 951 5080 3800

30 नोव्हेंबर 1500 3285 2900

7 डिसेंबर 1000 3600 2500

- Advertisment -

ताज्या बातम्या