पंतप्रधान मोदीजी पत्रास कारण की...; कांदाप्रश्नी लासलगावी शेतकऱ्यांचा प्रहार

पंतप्रधान मोदीजी पत्रास कारण की...; कांदाप्रश्नी लासलगावी शेतकऱ्यांचा प्रहार

लासलगाव | वार्ताहर Lasalgaon

कांद्याला हमीभाव मिळावा या करिता लासलगाव (Lasalgaon) येथील कृषी उत्पन्न बाजार (Lasalgaon apmc) समितीत प्रहार जनशक्तीच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले....

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र पाठवून कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाप्रसंगी प्रहार जनशक्ति उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तु बोङके, जिल्हाअध्यक्ष शरद शिंदे, उपजिल्हाप्रमुख सागर निकाळे, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष दत्ता आरोटे, जिल्हा सरचिटणीस समाधान बागल, नाशिक शहरध्यक्ष शाम गोसावी, निफाङ तालुका अध्यक्ष दिगंबर वङघुले,

तालुका उपाध्यक्ष राहुल सोनवणे, शेरखान मुलानी, तालुका सचिव अरुण थोरे, संघटक नाना सांगळेआदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पत्रास कारण की....

प्रती किलो कांदा पिकवण्यासाठी साधारण २० ते २५ रुपये किलो खर्च येत असून सध्या कांद्याला सरासरी आठ ते दहा रुपये किलो भाव मिळत आहे. मिळणाऱ्या दरातून झालेला खर्चही निघत नसल्याने आर्थिक बजेट पूर्णता कोलमडले आहे. नाफेडच्या माध्यमातून ३० रुपये किलोने कांदा खरेदी करावा आणि मार्च ते मे महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला ५०० रुपये क्विंटल अनुदान द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com