<p>नाशिक | प्रतिनिधी </p><p>निफाड तालुक्यातील लासलगाव येथील मंडल अधिकारयाला साडेतीन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. रमेश निंबा बच्छाव असे लाच स्वीकारणाऱ्या मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. </p> .<p>बच्छाव या मंडल अधिकाऱ्याने खडक माळेगाव येथील तक्रारदाराकडे खरेदी केलेल्या शेतजमिनीला त्यांचे नाव लावून नाव नोंदणी करण्यासाठी आज 3 हजार 500 रुपयांची लाचेची मागणी केली होती.</p><p>त्यानंतर तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार, निफाड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय येथे सापळा रचण्यात आला. याठिकाणी साडेतीन हजाराची लाच स्वीकारताना मंडल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.</p>