Video : सप्तशृंगी घाटात दरड कोसळली

सप्तशृंगीगड | वार्ताहर | Saptashrungi gad

काल अर्धे शक्तीपीठ श्री सप्तशृंगी गडावर पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. यामुळे रात्री उशिरा सप्तशृंगीगड घाटात दरड कोसळल्याची घटना घडली...

याबाबत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट यांना माहिती मिळताच वाहतूक सुरळीत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक घटनास्थळी रात्री दोनच्या सुमारास दाखल झाले. रस्त्यावर पडलेल्या दगडांना जेसीबीच्या सहाय्याने हलवण्यात आले. अथक प्रयत्नाअंती घाटातली वाहतूक सुरळीत करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक अधिकारी जॉन भालेकर, पराग कुलकर्णी, रुपेश गवळी, रवींद्र पवार, नितीन गुजर यांनी काम पाहिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com