Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यासातपूर MIDC त कंपनीत स्फोट; सहा कामगार भाजले

सातपूर MIDC त कंपनीत स्फोट; सहा कामगार भाजले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सातपूर एमआयडीसीतील एका कंपनीत अचानक स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत सहा कामगार भाजल्याची घटना घडली. नायट्रोजन टाकीचा व्हॉल्व्ह उडाल्याने हा स्फोट झाल्याचे समजते आहे. जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत… (Lalit Hydraulics Systems company fire satpur)

- Advertisement -

प्राप्त माहितीनुसार, नाईस (NICE) परिसरात ललित हायड्रोलिक्स नावाची कंपनी आहे. कुणाल शिखरे हे या कंपनीचे संचालक आहेत. या कंपनीत अचानक सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास नायट्रोजन टाकीचा व्हॉल्व्ह उडाल्याने स्फोट झाला. एकूण ११ कामगार या कंपनीत काम करत होते. स्फोट इतका भीषण होता की कंपनीतून आगीचे लोळ बाहेर येत होते. दरम्यान, महापालिकेच्या आणि एमआयडीसीच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

यादरम्यान, जखमी कामगारांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. चंद्रकांत पुंजराम मुंशे, सुरज टेकाळे, लखन, कृष्णा मुरारी, रोशन दास व देविदास पवार अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमी ७० ते ८० टक्के भाजल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. जखमी हे ४० ते ४५ वर्ष वयोगटातील असल्याचे समजते.

दरम्यान, चंद्रकांत मुंशे, लखन आणि रोशन दास यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णाच्या नातलगांनी दिली.

कानठळ्या बसणारा आवाज झाला आणि…

वॉशरूममधून मी बाहेर आलो; अचानक मोठा लाल रंग दिसला. आणि कानठळ्या बसतील एवढा आवाज झाला. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अशी प्रतिक्रिया एका प्रत्यक्षदर्शी कामगाराने देशदूतशी बोलताना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या