Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यारुढी परंपरेनुसार लक्ष्मीपूजन उत्साहात

रुढी परंपरेनुसार लक्ष्मीपूजन उत्साहात

नाशिक | प्रतिनिधी Nashik

प्रत्येक घरी, दुकानात, व्यवसायाच्या ठिकाणी सदैव लक्ष्मीदेवतेचा वास असू दे, अशी मनोमन प्रार्थना करीत लक्ष्मीपूजन उत्साहात करण्यात आले.

- Advertisement -

लक्ष्मी पुजनाच्या ( LakshmiPujan ) वेळी सर्वत्र झेंंडुच्या फुलांच्या माळा , रंगी बेरंगी आकाश कंदील विद्युत दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील ( Diwali Festival ) मोठा सण असल्याने . पहाटे अभ्यंगस्नान करून सर्व आबाल वृंध्द सज्ज झाले होते. दुपारी मिष्टान्न भोजनाचा नैवैैद्य दाखविण्यात आला.फुलांनी सुशोभीत केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णू आणि कुबेर यांची पूजा मांंडली होती.

खवा, धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे र् लक्ष्मीलावाहून नंतर ते आप्तेष्तेटांना वाटले.. रात्री जागरणाचे कार्यक्रम झाले. आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संंचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. ते चारित्र्यवान, कर्तव्र्यदक्ष,संयमी, धर्मानिष्ठ नागरिकांच्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते असे अशी भावाना आजही कायम आहे.

ॐ महालक्ष्मी देवी! सिद्धी बुद्धी सहीत प्रतिष्ठित हो. या मंत्राचा जप करत पुजन झाले. रात्री सर्वत्र पणत्या लावल्या होत्या. विशेषता- कचराकुंडी जवळही दिवे लाऊन लक्ष्मीची बहीण दरिद्रा – अलक्ष्मी हिचेही पुजन करण्यात आले.

लक्ष्मीचे प्रतीक असलेल्या केरसुणी झाडु विक्रीतुन न अनेक गरीब विक्रेत्यांना दिलासा मिळाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या