नाशकात नवीन सिंग्नल व सीसीटीव्ही यंत्रणा बसवतांना नियोजनाचा अभाव

नाशकात नवीन सिंग्नल व सीसीटीव्ही यंत्रणा बसवतांना नियोजनाचा अभाव

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

नाशिक शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर व गुन्हेगारीवर नियंत्रण (Control of crime) मिळविण्याकारिता शहरातील सिंग्नलवर

स्मार्ट सिटी (smart city) तर्फे सीसीटीव्ही (CCTV) बसविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र नवीन सिंग्नल यंत्रणा (Signal system) बसविली जात असतांना जुना सिंग्नल न काढल्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊन अपघातांचे (accidents) प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या (Nashik City Police Commissionerate) वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण शहरात सुमारे ५० ठिकाणी सीसीटीव्ही (CCTV Camera) बसवण्याचा प्रस्ताव स्मार्ट सिटीला देण्यात आला होता.

या प्रस्तावात शहरात तब्बल ८०० स्मार्ट सिटी (smart city) कॅमेरे बसविण्याची योजना असून युद्धपातळीवर सदरहू काम सुरु आहे. सदर काम सुरु असतांना जुने सिंग्नल हे पुढे असून त्यामागे हे नवीन सिंग्नल लपलेले दिसून येत आहे व ती यंत्रणा कार्यान्वित देखील करण्यात आली आहे. मात्र कुठला सिंग्नल सुटला हे कळणे वाहनचालकांना कठीण जात आहे. स्मार्ट सिटी तर्फे नियोजन बद्ध काम यात होतांना दिसून येत नाही.

यासोबतच बऱ्याच ठिकाणी नवीन सिंग्नल बसवितांना वायर टाकण्याकरिता मुख्य रस्ता फोडला गेला मात्र त्या ठिकाणी करण्यात आलेले खड्डे (potholes) न बुजविल्यामुळे देखील दररोजच किरकोळ स्वरूपात अपघात घडत आहेत. या अपघातांची नोंद जरी पोलीस ठाण्यात नसली तरी अपघात घडून दुचाकी स्वारास दुखापत झाली आहे हे मात्र खरे. सुदैवाने येथील खड्यांमुळे मोठी दुर्घटना घडली नसली तरी ती घडायची स्मार्ट सिटी वाट बघणार काय ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

शहरातील बेशिस्त सिंग्नल

  • त्रिमूर्ती चौक सिंग्नल, नवीन नाशिक

  • सिटी सेंटर सिंग्नल

  • स्वा. सावरकर तरण तलाव सिंग्नल

  • गंजमाळ सिंग्नल

  • रेडक्रॉस सिंग्नल

  • नागजी सिंग्नल

  • मालेगाव स्टॅन्ड सिंग्नल

  • पेठरोड सिंग्नल

  • श्रीराम विद्यालयाय चौक सिंग्नल

  • फळ मार्केट यार्ड जवळील सिंग्नल

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com