Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याओपन मॉल संस्कृतीत नियोजनाचा अभाव

ओपन मॉल संस्कृतीत नियोजनाचा अभाव

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरातील मध्यवर्ती वस्तीत असलेल्या चांदीचा गणपती ते गाडगेमहाराज पुतळा आणि तसेच पुढे संदर्भ रुग्णालय ते भद्रकाली माता मंदिर या मेनरोड (Mainroad) भागात तयार झालेल्या ओपन मॉल (Open Mall) संस्कृतीला महापालिका (nashik Municipal Corporation) व पोलीस (Police) यांसोबत व्यावसायिकांचे नियोजन नसल्याने गर्दी होण्याचा काळा डाग लागला आहे….

- Advertisement -

शहरातील ओपन मॉल संस्कृती जोपासणारे रविवार कारंजा, मेनरोड, सराफ बाजार, गाडगे महाराज पुतळा, भद्रकाली माता मंदिर, संदर्भ सेवा रुग्णलाय आदी परिसरात व्यावसायिकांनी अनेक दुकाने थाटली.

मात्र, महापालिकेने पार्किंग (Parking) व्यवस्था केली नसल्याने दुकानांच्या समोरच हॉकर्स आणि वाहनांनी अतिक्रमण केले. यावर पोलिसदेखील उघडपणे डोळेझाक करत आहेत.

शहरातल्या सर्वात गजबजलेल्या आणि मध्यमवर्गीयांची महत्त्वाची बाजारपेठ म्हणून रविवार कारंजा ते शालिमार चौक; गाडगेमहाराज पुतळा ते भद्रकाली माता मंदिर या भागांना ओळखले जाते.

मात्र या दुकानांमध्ये येणारे ग्राहक वाहने कुठे पार्क करतील, तसेच हॉकर्सने केलेल्या अतिक्रमनांनी सलग असलेल्या रस्त्यावर नागरिक चालतील कसे, हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न असला तरी त्यावर तोडगा अद्याप तरी निघालेला नाही.

या भागात दररोज हजारोंच्या संख्येने ग्राहक येत असतात. पायी चालणे जितके सुकर तुलनेने वाहने घेऊन येणे अतिशय अवघड होऊन बसले आहे. या भागात वाहने घेऊन प्रवास करणे म्हणजे वाहनधारकांसोबतच पायी चालणार्‍यांसाठीदेखील सजाच आहे.

सणासुदीला वाहतूककोंडी

हिंदू धर्मियांचे दसरा, दिवाळी, पाडवा, गणेशोत्सव तर मुस्लिम धर्मियांचे ईद, रमजान, संदल, मोहरम या उत्सवादरम्यान मोठी आर्थिक उलाढाल या ठिकाणी होत असते; मात्र, त्यामुळे वाहतुकीस आणि ग्राहक वर्गाला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असतो. शहराच्या अनेक भागांना जोडणारा हा मार्ग असल्याने याला पर्यायी रस्तादेखील नाही. परिणामी, अर्धा ते एक तास ट्रॅफिक उत्सवाच्या काळात याठिकाणी होत असते.

आमचा व्यवसाय आम्ही येथे करत आहोत; मात्र, या ठिकाणी वाहने लावण्यास जागा नसल्याने ग्राहक दुकानांसमोर वाहने लावत आहेत. करोना निर्बंध शिथिल झाल्यामुळे आता गर्दी वाढत आहे. पोलिसांनी तसेच महापालिका यांनी गर्दी कमी होण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजे. यात प्रामुख्याने जी दुकाने कायदेशीर परवानाधारक आहेत त्यांनाच परवानगी मिळाली. हॉकर्स वगैरेसाठी वेगळी जागा करून द्यावी.

– दुकानदार, व्यावसायिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या