भाजीबाजारात फळभाज्या, पालेभाज्यांचा तुटवडा

अवकाळीचा दुष्परिणाम; 60 टक्के आवकेत घट
भाजीबाजारात फळभाज्या, पालेभाज्यांचा तुटवडा

नाशिक । सोमनाथ ताकवाले Nashik

परपेठेला आणि इतर राज्यांना भाजीपाला (Vegetables), फळभाज्या पुरवठा करणार्‍या नाशिक जिल्ह्यातच (nashik district) गेल्या 15 दिवसांपासून शेतमालाची कमालीची आवक घटली आहे.

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आणि त्यानंतर अचानकच वाढलेल्या गारठ्याने मेथी (Fenugreek), शेपू, पालक (Spinach), कांदापात या पालेभाज्यांसह कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगे, कारले, ढोबळी, टोमॅटो भोपळा आदी फळभाज्यांची सुमारे 60 टक्के आवक घटली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बाजार बाजारात मागणी पुरवठा प्रमाण व्यस्त झाले असून तुटवडा निर्माण झाला आहे. दर अव्वाच्या सव्वा वाढले आहे, या महागाईचा (Inflation) फटका स्थानिक भाजीमंडईत ग्राहकांना बसत आहे.

गत आठ दिवसांपासून भाजीबाजारात कोबी, फ्लॉवर, कारले, शेवगा, वांंगे, भेंडी, मिरची, कुरमुरा वालाचे किलोचे दर सुमारे 120 ते 160 रुपये झाले आहे. तर मार्केट यार्डातच कोबी 40 ते 50 रुपये नग, फ्लॉवर 60 ते 70 ुरुपये प्रतिनग दराने विक्री होत आहे. फळभाज्यांचे भाव अडीच पट वाढले आहे. शेतमाल कमी येत असल्याने घाऊक व्यापार्‍यांबरोबरच किरकोळ भाजी विक्रेत्यांंची खरेदीला चढाओढ असल्याने यार्डात निकृष्ट दर्जाचा मालही सध्या भाव खात आहे. त्यामुळे भाजीमंडईमध्ये दर वाढल्याचे चित्र ग्रामीण आणि शहरी भागात दिसत आहे.

अवकाळी पाऊस होऊन आता महिना उलटला आहे. त्याचे शेतीवर झालेले दुष्परिणाम आता दिसून येत आहे. त्यावेळी अवकाळीने खरीप हंगामातील सोंगणी झालेले पिके, रव्वी लागवडीच्या टप्प्यातील रोपे आणि भाजीपाल्याचे काढणी योग्य पिकांची अपरिमाणीत हाणी केलेली होती. त्यामुळे यार्डात सध्या येणारा माल निम्यापेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे मागणी तसा पुरवठा, हे सुत्र विस्कळीत झाल्याने व्यापार्‍यांसह ग्राहकही यार्डात त्रस्त झालेले आहे. नाशिक जिल्ह्यातून (nashik district) सध्या मुंबई (mumbai), गुजरात (gujrat), मध्यप्रदेश (madhya pradesh) आणि सिमावर्ती पाठवला जाणार्‍या भाजीपाल्याच्या गाड्यांची संख्या निम्म्यापेक्षा अधिक कमी झाली आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत (Nashik Agricultural Produce Market Committee) सध्या 40 ते 45 टक्केच आवक रात्र, दिवस आणि सकाळ सत्रात होत आहे. त्यामुळे खरेदीदार मिळेल तो माल घेऊन जाण्यासाठी धावपळ करीत आहेत. यार्डात सध्या 12 किलोच्या वांगे जाळीला 1300 रुपये लिलावात दर मिळत आहे. भेंडीची 10 किलोची जाळी 500 ते 700 रुपये, कारले 400 ते 700 रुपये,

दोडके 500 ते 1000 रुपये, गिलके 400 ते 600 रुपये , गवार 100 ते 140 रुपये किलो, शेवगा 100 ते 125 रुपये किलो, मिरची 50 रुपये किलो दराने लिलावात विक्री होत आहे. तर पालेभाज्यांमध्ये मेथी 2500 रुपये ते 5000 रुपये शेकडा, शेपू 1500 ते 2500 रुपये शेकडा, कांदापात 2 हजार ते 4 हजार रुपये शेकडा आणि कोंथंबिर जाड काडी आणि छाणी प्रकारानुसार 800 रुपये ते 3000 रुपये शेकडा दराने लिलावात उचलली जात आहे.

गाजर, वटाणे ऐरवी सर्वात महागडे असतात, पण आठ दिवसांपासून कारले, वांगे, टोमॅटो यांच्या पाव किलोच्या दरात एक किलो वटाणा मिळत असल्याने तो खरेदी करणे श्रेयस्कर वाटत आहे. नाशिकमध्ये पहिल्यांदाच हिवाळ्यात एवढे भाजीपाल्याचे दर वाढलेले पहायला मिळत आहे.

- दुर्गा मिसाळ, गृहिणी

अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले होते. नवीन रोपे लागवडही थंडीत कोमजून गेली आहे. त्यामुळे शिवारात भाजीपाला नाही. नवीन आवक होण्यास किमान 40 ते 50 दिवस लागतील.

- पदमाकर गावित, शेतकरी, कळवण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com