मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा मृत्यू

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा मृत्यू

ठाणे | Thane

ठाण्यातील नौपाडा (Naupada) येथे एक दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. येथील हॉटेल स्वाद (Hotel Swad) जवळ ‘सत्य नीलम’ या ठिकाणी बांधकाम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे...

मिळालेल्या माहितीनुसार ठाण्यातील नौपाडा परिसरात असणाऱ्या हॉटेल स्वाद जवळ एका इमारतीचे बांधकाम (Construction) सुरू असताना त्या ठिकाणी मातीचा मोठा ढिगारा अंगावर पडून तीन मजुर अडकले.

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा मृत्यू
हे सरकार येण्यामागे अदृष्य हात; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन दलाचे (fire brigade) अधिकारी व जवान, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व नौपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी धाव घेत मदत कार्य सूरू केले.

सदर घटनास्थळी अडकलेल्या तिन्ही व्यक्तींना बाहेर काढून सिव्हील रूग्णालय ठाणे येथे उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी तीन कामगारांपैकी दोघांना मृत घोषित केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

मुंब्रातील (Mumbra) शिवाजी नगर येथे राहणारे निर्मल रामलाल राब (Nirmal Ramlal Raab) (वय-४९) जखमी असून त्यांच्या गळ्याला दुखापत झाली आहे. तर शंकर मंदिर येथे राहणारे हबीब बाबू शेख(वय-४२), तिसऱ्या व्यक्तीचे नाव रणजीत असून ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. हे तिघे त्या ढिगाऱ्याखाली अडकले होते.

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा मृत्यू
टेकऑफवेळी विमान आदळलं धावपट्टीवर अन् पुढे घडलं असं काही...
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com