Video : साश्रूनयनांनी जवान कुलदीप जाधव यांना अखेरचा निरोप

पत्नीचा हंबरडा; बागलाणवासियांना अश्रू अनावर
Video : साश्रूनयनांनी जवान कुलदीप जाधव यांना अखेरचा निरोप

नाशिक | प्रतिनिधी

देशसेवेसाठी सीमेवर तैनात असलेले बागलाणचे सुपुत्र कुलदीप जाधव यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली. आज साश्रूनयनांनी जवान कुलदीप यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

पंचक्रोशीतून हजारो नागरिक जवान कुलदीप यांना निरोप देण्यासाठी आला होता. शिवाजी पुतळा ते भाक्षी रोड येथील कुलदीप यांच्या निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी कुलदीप जाधव अमर रहे, अमर रहे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या.

आठ दिवसांपूर्वीच त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यासाठी कुलदीप सुट्टीवर येणार होते अशातच अतिथंडीमुळे जाधव यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. आपल्या मुलाला पाहण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

कुलदीप जाधव हे चार वर्षांपासून सैन्यात भरती झाले होते. जम्मू काश्मीरच्या राजोरी सेक्टरमध्ये ते तैनात होते. या परिसरात प्रचंड थंडी असल्याने झोपेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय सैन्यदलाने सटाणा पोलीस ठाण्याला दिल्यानंतर गावावर शोककळा पसरली.

कुलदीप जाधव यांचे मुळगांव पिंगळवाडे असून लहानपनापासून ते सटाणा शहरातील भाक्षी रोड येथे वास्तव्यास होते. जाधव यांच्या पश्चात आठ दिवसांचा मुलगा, पत्नी, आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे. आज त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com