एकनाथ शिंदेंना यश मिळो; राज्यात लवकरच भाजपची सत्ता

मुंबईहून महंत आले त्र्यंबकराजाच्या दर्शनाला

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Nashik

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde, Shivsena leader) हे सध्या सुरतमध्ये (Surat) आहेत. ते तिथे सुरक्षित राहोत. त्यांच्यासोबत जे सर्वजण आहेत ते सर्वजन सुरक्षित राहोत. राज्यात लवकरच भाजपची सत्ता येणार असल्याचे वक्तव्य सुर्यापीठ गुरूस्थान मुरली आश्रम द्वारकाचे पीठाधीश्वर कृष्णदेवनंद गिरी जी महाराज (Krishnadev giriji maharaj) यांनी केले आहे. ते आज त्र्यंबकेश्वरमध्ये माध्यमांशी बोलत होते....

ते म्हणाले राज्यात सत्तांतर होणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत 21 आमदार आता सुरत मध्ये असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भाजपच्या सहकार्याने सरकार स्थापन होण्यासाठी हे सर्व सुरु असल्याचे ते याप्रसंगी म्हणाले.

छत्रपती शिवरायांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) सुरतेवर जाण्यापूर्वी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले होते. त्याच उद्देशाने मी एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्रार्थना केली आहे. आता त्यांच्याकडे एकवीस आमदार आहेत असा दावा त्यांनी केल्यामुळे राजकीय चर्चांना आणखीनच उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com