राज्यात ‘कृषी ऊर्जा पर्व’

राज्यात ‘कृषी ऊर्जा पर्व’

मुंबई । प्रतिनिधी

राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीजजोडणी, दिवसा 8 तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा, कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती व सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग व कृषी ग्राहकांच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या उद्देशाने राज्य शासनाने कृषीपंप वीजजोडणी धोरण-2020 जाहीर केले असून, महावितरणद्वारे त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

या धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर दि.1 मार्च ते 14 एप्रिल 2021 पर्यंत कृषी ऊर्जा पर्व राबवले जाणार असून, जनजागृतीसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या पर्वाचा शुभारंभ दि.1 मार्च रोजी दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईनद्वारे करण्यात येणार आहे.

या ऑनलाईन कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com