तलाठ्यासह कोतवाल पाच हजारांची लाच घेतांना जाळ्यात

चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा येथील घटना
तलाठ्यासह कोतवाल पाच हजारांची लाच घेतांना जाळ्यात

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -

शेतजमीन (agricultural land) पत्नीच्या नावावर करण्यासाठी तलाठी (Talathi) ज्ञानेश्वर सुर्यभान काळे (वय 50) रा.शिवशक्ती नगर चाळीसगाव, कोतवाल (Kotwal) किशोर गुलाबराव चव्हाण (वय 37) रा. श्रीकृष्ण नगर चाळीसगाव यांना पाच हजारांची लाच स्विकारतांना (accepting a bribe) लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (Anti-Bribery Department) सापाळा रचून रंगेहात (Caught red-handed.) पकडले. हि घटना कारवाई दि,२३ रोजी करण्यात आली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दोघांवर गुन्हां दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार यांचे वडीलांनी त्यांनी केलेल्या मृत्यूपत्रान्वये तक्रारदार यांचे नावे बोरखेडा बु॥ येथील शेतजमीन केलेली आहे. तक्रारदार यांचे हिश्यावर एकुण ३ गट वाटणीस आलेले आहेत. सदर ३ गटांपैकी ६४/२ ही शेतजमीन तक्रारदार यांना त्यांची पत्नी प्रतिभा पाटील यांचे नावे करायची आहे. जेणेकरून ते अल्पभूधारक म्हणून गणले जातील, म्हणून नोव्हेंबर-२०२१ मध्ये तलाठी ज्ञानेश्वर सुर्यभान काळे यांनी सांगितल्याप्रमाणे सदरचे प्रकरण सादर केलेले आहे. सदर शेती पत्नीच्या नावे करण्यासाठी आलोसे क्रं.१ यांनी यापूर्वी देखील तक्रारदार यांच्याकडून एकुण ७ हजार रुपये घेतलेले आहे.

तरी देखील सदर काम न झाल्यामुळे तक्रारदार आलोसे क्रं.१ यांना तलाठी कार्यालयात जावून भेटले असता, त्यांनी तक्रारदार यांच्या नावे असलेली शेतजमीन पत्नी सौ.प्रतिभा पाटील यांचे नावे करण्याच्या मोबदल्यात प्रथम ७ हजार रुपये व तडजोडीअंती पंचासमक्ष ५ हजार आरोपी क्रं.१ यांच्यावतीने आरोपी क्रं.२ यांनी तक्रारदार यांच्याकडे करून लाचेची मागणी केली. यासंबंधीत तक्रारदार याने एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीच्या तक्रारीची खातरजमा करुन, त्या अनुषंगाने आज सापाळा लावला असता, दोघांना पंचासमक्ष दि.२३/०३/२०२३ रोजी स्वतः लाच स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

त्यांच्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. हि कारवाई पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील, पो.नि. एन.एन.जाधव, पोना. संजोग बच्छाव, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, पो.कॉ.सचिन चाट यांच्यासह स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदिच्या पथकाने पोलीस अधीक्षक ,श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक एन.एस.न्याहळदे, पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com