सुपर ओव्हर मध्ये कोलकाताची हैद्राबादवर मात

IPL
IPL

अबुधाबी । वृत्तसंस्था

कोलकाता विरुद्ध हैद्राबादच्या सामन्यात कोलकाताच्या संघाने सुपर ओव्हरच्या माध्यमातून विजय मिळवला .

नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला .कोलकाताने फलंदाजी करतांना शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठीने केकेआरला चांगली सुरुवात करुन दिली. सहाव्या ओव्हरमध्ये राहुल 23 धावा करून नटराजनच्या चेंडूवर बाद झाला .

कोलकाताचा शुभमन गिल आणि नीतीश राणाला चांगली सुरुवात मिळाली. परंतु पाहिजे तशी धावसंख्या मिळू शकली नाही गिलने 37 चेंडूत 36 धावा केल्या. त्याला राशिद खानने बाद केले. यानंतर राणादेखील 29 धावा करून विजय शंकरच्या चेंडूवर बाद झाले . कोलकाताने हैदराबादला १६४ धावांचे लक्ष्य दिले.

कोलकाताने हैदराबादला १६४ धावांचे दिले. १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर केन विल्यमसन आणि बेअरस्टो यांनी अर्धशतकी भागीदारी केली. विल्यमसन २९ धावांवर बाद झाला. क्रमवारीत वर आलेला प्रियम गर्गदेखील ४ धावावर माघारी गेला. जॉनी बेअरस्टोने चांगली सुरूवात केली होती. पण तो ३६ धावा काढून बाद झाला.

मधल्या फळीतील मनिष पांडे (६) आणि विजय शंकरने (७) संघाची निराशा केली. नवख्या अब्दुल समदने १५ चेंडूत २३ धावा करत हैदराबादसाठी विजयाच्या आशा जागवल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने तीन चौकार ठोकले पण सामना बरोबरीत सुटला. वॉर्नरने ५ चौकारांसह नाबाद ४७ धावा केल्या.

१६४ आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये IPL-2020 चा पहिलाच सामना खेळणाऱ्या लॉकी फर्ग्युसनने केवळ २ धावा देत २ बळी घेऊन हैदराबादचा डाव संपवला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com