Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याकोलकाता नाइट रायडर्सचा तिसरा विजय

कोलकाता नाइट रायडर्सचा तिसरा विजय

आबुधाबी । वृत्तसंस्था

एखादा सामान जिंकता जिंकता कसा हरता येऊ शकतो, याचा उत्तम वस्तुपाठ महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने दाखवला.

- Advertisement -

कारण विजयासाठी 168 धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 2 बाद 100 अशा सुस्थितीत होता. पण त्यानंतर अर्धशतकवीर शेन वॉटसन बाद झाला आणि चेन्नईच्या अन्य फलंदाजांनी हाराकिरी पत्करली. त्यामुळे चेन्नईवर आपल्या हातातील सामना गमावण्याची पाळी आली. राहुल त्रिपाठीच्या 81 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने 168 धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा यशस्वीपणे पाठलाग चेन्नईच्या संघाला करता आला नाही.

केकेआरच्या 168 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात अडखळत झाली. चेन्नईच्या फॅफ ड्यू प्लेसिस आणि अंबाती रायुडू यांना यावेळी मोठी खेळी साकारता आली नाही. पण शेन वॉटसनने या सामन्यातही अर्धशतक झळकावत कमाल केली. वॉटसनने 40 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 50 धावा केल्या. अर्धशतक झळकावल्यावर वॉटस लगेच बाद झाला. वॉटसननंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अष्टपैलू सॅम करनही यावेळी झटपट बाद झाले. त्यामुळे चेन्नईचा संघ अडचणीत सापडला होता.

कोलकाता नाइट रायडडर्स संघाच्या राहुल त्रिपाठीने आज सलामीला येत वादळी खेळी साकारल्याचे पाहायला मिळाले. राहुलच्या या धडाकेबाज खेळीच्या जोरावरच कोलकाता संघाला चेन्नई सुपर किंग्सपुढे मोठे आव्हान ठेवता आले. राहुलचे या सामन्यात शतक हुकले असले तरी त्याची फलंदाजी नेत्रदीपक अशीच होती. राहुलने यावेळी 51 चेंडूंत 8 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 81 धावांची जबरदस्त खेळी साकारली. त्यामुळेच केकेआरला यावेळी चेन्नईपुढे 168 धावांचे आव्हान ठेवता आले.

कोलकात्याच्या डावाची यावेळी चांगली सुरुवात झाली नाही. कारण त्यांना सलामीवीर शुभमन गिल आणि नितीष राणा यांना लवकर गमवावे लागले. गिलने यावेळी 11 धावा केल्या, तर राणाला 9 धावा करता आल्या. पण कोलकाताचे हे दोन्ही फलंदाज अपयशी ठरले असले तरी त्यांची ही कसर राहुल त्रिपाठीने भरून काढली. कारण या सामन्यात पहिल्यांदाच राहुल त्रिपाठीला सलामीला पाठवण्यात आले होते.

राहुलने या संधीचे सोने करत अर्धशतक झळकावल्याचेही पाहायला मिळाले.कोलकाताकडून यावेळी इऑन मॉर्गन आणि आंद्रे रसेल हे दोन्ही अनुभवी फलंदाज अपयशी झालेले पाहायला मिळाले. कारण मॉर्गनला यावेळी फक्त सात धावा करता आल्या, तर रसेलला दोन धावांवरच समाधान मानावे लागले.

- Advertisment -

ताज्या बातम्या