कोलकाताची राजस्थानवर मात

IPL
IPL

दुबई । वृत्तसंस्था

कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात कोलकाता संघाने बाजी मारली .

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जोफ्रा आर्चरने नितीश राणाला पहिल्याच षटकात माघारी धाडलं. यानंतर शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी या फलंदाजांनी संयमी खेळ करत कोलकाता नाईट रायडर्सचा डाव सावरला. शुभमन गिल ने ३६ धावा केल्या तर राहुल त्रिपाठी ने ३९ धाव केल्या. दोन्ही फलंदाजांनी धावांचा ओघ कायम ठेवला.

दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावा जोडल्यानंतर गिल- राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर बाद झाला. . यानंतर चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आलेला सुनिल नारायणही माघारी परतला. राहुल तेवतियाच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सने त्याचा झेल घेतला. राहुल त्रिपाठीही ठराविक अंतराने माघारी परतल्यामुळे चांगली सुरुवात करुनही मोक्याच्या क्षणी कोलकाताचा संघ अडचणीत सापडला.

कर्णधार मॉर्गन आणि आंद्रे रसेलने फटकेबाजी करत राजस्थानसमोर मोठं आव्हान निर्माण केलं. मॉर्गनने नाबाद ६८ धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतकी खेळीत ५ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.कर्णधार ओएन मॉर्गनचं नाबाद अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने महत्वाच्या सामन्यात १९१ धावांपर्यंत मजल मारली.

१९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरवात चांगली झाली नाही . पॅट कमिन्स आणि इतर गोलंदाजांपुढे राजस्थानच्या सर्व फलंदाज अपयशी ठरले. जोस बटलर आणि राहुल तेवतिया यांनी काही क्षणांसाठी भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांचे प्रयत्नही अपुरे पडले. राजस्थानकडून बटलरने ३५ तर तेवतियाने ३१ धावांची खेळी केली.

स्पर्धेत आव्हान टिकवण्यासाठी विजय आवश्यक असलेल्या सामन्यात राजस्थानला कोलकाता नाईट रायडर्सकडून ६० धावांनी पराभव स्विकारावा लागला. राजस्थानचा संघ १३१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. या पराभवासोबत राजस्थानचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com