जळगावच्या कोगटा आयुर्वेदीक दुकानावर वन अधिकार्‍यांकडून छापा

वन्यप्राण्यांच्या अवशेष विक्रीप्रकरणी तिघांना अटक
जळगावच्या कोगटा आयुर्वेदीक दुकानावर वन अधिकार्‍यांकडून छापा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील भवानीपेठेतील (Bhawanipeth) प्रख्यात असलेल्या मे. रामनाथ मुलचंद कोगटा (May Ramnath Mulchand Kogata) या आयुर्वेदिक वनौषधीच्या दुकानात (Ayurvedic herbal shop) वन्यप्राण्यांच्या अवशेषांची विक्री (Sale of wildlife remains) होत असल्याची माहिती वनविभागाला (Forest Department) मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी जळगाव विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग (Conservator of Forests Vivek Hoshing) यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या अधिकार्‍यांनी कोगटा यांच्या दुकानावर छापा (raided) टाकला. यात वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त (Seized remains) करण्यात आले असून याप्रकरणी डॉ. अजय कोगटा यांच्यासह तीन जणांना अटक (Three people were arrested) करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील भवानीपेठेत असलेल्या मे. रामनाथ मुलचंद कोगटा यांच्या दुकानात आयुर्वेदिक व वनौषधींची विक्री केली जाते. या दुकानात दुकानात वन्य प्राण्यांचे अवशेषांची विक्री होत असल्याची माहिती जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथकाने भवानीपेठ येथील मे.रामनाथ मुलचंद कोगटा या दुकानात छापा टाकला. ही कारवाई सुरू असतांना परिसरातील नागरिकांसह इतर व्यापार्‍यांनी गर्दी केली होती.

तीन जणांना केली अटक

वनविभागाने भवानीपेठ जळगाव येथील मे. रामनाथ मुलचंद कोगटा या दुकानात छापा टाकुन कारवाई करत डॉ. अजय लक्ष्मीनारायण कोगटा (वय 53, रा. जळगाव), चुनीलाल नंदलाल पवार (वय 30, रा. खेडगाव ता. एरंडोल), लक्ष्मीकांत रामपाल मन्यार (वय 54, रा. जळगाव) अशा तीन जणांना अटक केली आहे. तीनही जणांवर वन्यप्राण्यांची शिकार व तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. अजय लक्ष्मीनारायण कोगटा व चुनीलाल नंदलाल पवार या आरोपींना 3 दिवसाची वनकोठडी सुनावली आहे. लक्ष्मीकांत रामपाल मन्यार या आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

या प्राण्यांचे अवशेष केले जप्त

वनविभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये हताजोडी नग-11, रानमांजर रंगनी नग-11, सियारसींगी नग-260, कासवपाठ नग-1, इन्द्रजाल नग-38, नाग मणके नग-21, घुबळ नखे नग-3 समुद्रघोडा नग-2 या वन्यजीवांचे अवशेष जप्त केले. सदर प्रजातींचा समावेश वन्यजीव कायदा 1972 मधिल परिशिष्ठ 1 व 2 मध्ये समावेश असुन या प्राण्यांच्या शिकारीसाठी 7 वर्षे कारावासाची तरतुद आहे.

यांनी केली कारवाई

सहा. वनसंरक्षक सुदर्शन शिसव, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पंडीत, वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे, वनपाल संदिप पाटील, वनपाल योगेश दिक्षित, वनरक्षक उल्हास पाटील, वनरक्षक प्रशांत सोनवणे, वनरक्षक जितेंद्र चिंचोले, वनरक्षक अजय रायसींग, वनरक्षक संभाजी पाटील व वाहन चालक ज्ञानेश्वर पवार यांनी ही कारवाई केली.अधिक तपास उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. वनसंरक्षक उमेश बिराजदार व वनपरिक्षेत्र अधिकारी भाईदास थोरात करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com