Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा निवडणुकीचा बिगुल : जाणून घ्या, एक सदस्यीय प्रभाग रचनेचा फायदा कोणाला?

मनपा निवडणुकीचा बिगुल : जाणून घ्या, एक सदस्यीय प्रभाग रचनेचा फायदा कोणाला?

नाशिक (Nashik) पुणे (Pune)सोबत राज्यातल्या १८ महानगरपालिकांमध्ये (Municipal Corporation) ‘एक प्रभाग एक नगरसेवक’ (One ward one Corporator) पद्धतीनुसार आगामी निवडणुका होणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) यासंदर्भात अध्यादेश बुधवारी काढला आहे. त्यामुळे लवकरच राज्यात महापालिका निवडणुकांचं (Municipal Elections) बिगुल वाजण्याची शक्यता आहे.

नाशिकचे पोलिस आयुक्त म्हणतात, राणेंवर १७ सप्टेंबरपर्यंत कारवाई नाही, पण २ तारखेला ते येतील

- Advertisement -

राज्यातील नाशिक, मालेगाव, पुणे, पिंपरी चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

एक सदस्यीचा फायदा कोणाला?

आगामी महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धती असणार आहे हे स्पष्ट झाले आहे. आता एकसदस्यीय व बहुसदस्यीय वार्डरचनेचे फायदे तोटे यावर चर्चा सुरु झाली आहे. २०२२च्या निवडणुकीमध्ये जर एक सदस्यीय पद्धतीचा फायदा कोणाला होणार? प्रभागाच्या सीमा कशा असतील? आरक्षणे कसे पडेल? बदललेल्या समीकरणाचा फायदा कुणाला होणार? छोट्या-मोठ्या पक्षांसह पुन्हा अपक्ष पालिकेतील का? यासंदर्भात आता चर्चा सुरू झाल्या आहेत.

एकसदस्यात अपक्षांची संख्या वाढते

महापालिकेच्या आजवरच्या निवडणुकीवर नजर टाकल्यास एक सदस्यीय प्रभाग रचनेत अपक्षांची संख्या वाढल्याचे दिसून येते. प्रभाग जेवढा मोठा, तितकी अपक्षाची संख्या कमी असते. कारण छोट्या वार्डात अपक्ष सहज निवडून येतात. परंतु वार्ड मोठे झाले की त्यांच्यांसाठी निवडणूक अवघड होते. चार सदस्यीय प्रभाग रचना व केंद्र तथा राज्यातील सत्ता यामुळे सन २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत भाजपला फायदा झाल्याचे दिसून आले़ परंतु, एक अथवा दोन सदस्यीय प्रभाग रचनेत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाल्याचाही इतिहास आहे़. एक सदस्यीय प्रभाग रचना राष्ट्रवादी काँग्रेसला फायदेशीर ठरणार असल्याची शक्यता आहे.

२०११ च्या जणगणनेनुसार प्रभाग

निवडणूक आयोगाने २०२१ ची जनगणना झाली नसल्याने २०११ च्या जनगणनेनुसारच प्रभाग रचना केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रभाग रचनेनुसार प्रभागाची सीमा ठरवताना काही सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच प्रभाग रचना केली जाणार आहे. यामध्ये मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते उड्डाणपूल या यांच्या नैसर्गिक मर्यादा लक्षात घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यासोबतच एका इमारतीचे किंवा एका घराचे, एका चाळीचे दोन प्रभागात विभाजन होणार नाही याची काळजी घ्या असं सांगण्यात आलं आहे. मोकळ्या जागांसह सर्व सार्वजनिक जागा या कोणत्या ना कोणत्या प्रभागात यायला हव्यात. शिवाय प्रभाग रचना करताना रस्ते, नद्या, नाले, सिटी सर्व्हे यांच्या नंबरला उल्लेख करणं गरजेचं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या