आज वाचक प्रेरणा दिन : डॉ.कलामांच्या जीवनातील वेगळपण जाणून घ्या...

आज वाचक प्रेरणा दिन : डॉ.कलामांच्या जीवनातील वेगळपण जाणून घ्या...

भारताचे लोकप्रिय दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम (APJ Abdul kalam) ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जातात. लोकांचे राष्ट्रपती अशी ओळख त्यांची आहे. त्यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूमधील रामेश्वर येथे झाला. २७ जुलै २०१५ रोजी आयआयएम- शिलॉंग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असताना त्यांचे निधन झाले. त्यांची जयंती वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. जाणून घेऊया त्यांच्या जीवानातील काही खास गोष्टी...

पहिले अपयशच आले होते, पण...

डॉ.अब्दुल कलाम यांना पायलट बनायचे होते. त्यांनी एयरोनाॅटीकल इंजीनीयरची पदवी घेतली. त्यावर्षी संपुर्ण भारतातुन केवळ आठ मुले ही पदवी घेऊ शकले होते. त्याकाळी फक्त ‘एअर इंडीयातच पायलटची जागा भराली जात होती. एअर इंडीयात फक्त सात जागा भरायच्या होत्या आणि अर्ज आठ आले होते. त्यात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम हे टॉपर होते. पण ऊंची कमी आहे, यामुळे त्यांची निवड झाली नाही. ते खुप हताश झाले. रामकृष्ण मठात गेले. आपली निराशा स्वामीजींना सांगितली. स्वामीजी म्हणाले, का ऊदास आहेस?.. जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ नव्हे, की तु कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनु शकत नाही. कदाचीत ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल. नंतर ईस्त्रोची जाहिरात पाहिली. पगार एअर इंडीयाच्या दुप्पट. मुलाखतीला आठ कँडीडेट. एकच जागा. यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली. पुढे त्यांचे जीवन सर्वांना माहितच आहे.

मोठी खुर्ची नाकारली

डॉ.कलाम आयआयटी (बीएचयू) च्या पदवीप्रदान समारंभासाठी गेले. त्या ठिकाणी व्यासपीठावर पाच खुर्च्या ठेवल्या होत्या. त्यात एक मोठी खुर्ची अर्थात राष्ट्रपती डॉ.कलाम यांच्यासाठी होती. परंतु कलाम यांनी त्या खुर्चीवर बसण्यास नकार दिला. कुलगुरुंना त्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला. परंतु कुलगुरु राष्ट्रपती समोर असतांना त्या खुर्चीवर बसणे अशक्यच होते. शेवटी सर्व खुर्चा सारख्या झाल्यावर डॉ.कलाम त्या ठिकाणी बसले.

राष्‍ट्रपती भवनातून दोन सुटकेस घेऊनच परतले

राष्‍ट्रपती भवनात दोन सुटकेस घेऊन गेलेले डॉ. कलाम रिटायरमेंटनंतर त्‍या सुटकेस घेऊन परतले होते. पुस्‍तक, विणा, शास्‍त्रीय संगीताच्‍या कॅसेट व विज्ञान इतकीच माझी मालमत्‍ता असल्‍याचे ते विनोदाने म्‍हणत असत.

कधीच निवृत्त झाले नाही

डॉ. कलाम कधीच निवृत्त झाले नाहीत. एक काम संपले की दुसरे काम त्यांनी हातात घेतलेच म्हणून समजा. राष्ट्रपती झाल्यानंतर ते ‘इंडिया व्हिजन २०२०’ ही मोहीम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झाले. ‘श्रेष्ठता तुमच्या कार्याने तयारे होते, ती अपघाताने येत नाही असे प्रेरणादायी विचार त्यांनी मांडले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com