Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यामुश्रीफांच्या घरावर ईडीचा दुसऱ्यांदा छापा; किरीट सोमय्या म्हणाले...

मुश्रीफांच्या घरावर ईडीचा दुसऱ्यांदा छापा; किरीट सोमय्या म्हणाले…

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि आमदार हसन मुश्रीफ (MLA Hasan Mushrif) ईडीच्या (ED) रडारवर असून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे…

- Advertisement -

दीड महिन्यांपूर्वी ईडीने मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा (Raid) टाकला असून अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या घरातून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईवरून राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी देखील आता याबाबत भाष्य केले आहे.

हसन मुश्रीफांच्या घरी पुन्हा ED चा छापा

सोमय्या म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी मी कोल्हापूरला (Kolhapur) जायला निघालो होते. तेव्हा उद्धव ठाकरे आणि मुश्रीफ यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच जनतेच्या लक्षात आलं होतं की मुश्रीफ यांनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला आहे. आयकर विभाग, सहकार मंत्रालय आदींनी या घोटाळ्याची चौकशी केली आहे. हा घोटाळा (Scam) १०० कोटींच्या घरात जातो आहे, त्यामुळे याची चौकशी होणार असून मुश्रीफांना याचा हिशोब द्यावाच लागेल, असे किरीट सोमय्यांनी सांगितले.

…तर आम्हाला गोळ्या घालून संपवून टाका; ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफांच्या पत्नीची तीव्र प्रतिक्रिया

तसेच सोमय्या पुढे म्हणाले की, मुश्रीफांनी सांगितले की माझ्या कारखान्यात (Factory) हजारो शेतकरी भागीदार आहेत. पण हे सर्व खोटं आहे. मुळात शेतकऱ्यांकडून (Farmers)५० हजार घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. ४० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नावाने जमा केले, त्या पैशांचे काय झाले. मी कोल्हापूरला गेलो, तेव्हा शेकडो शेतकरी येऊन मला भेटले. शेतकऱ्यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्याचा तपास सुरू आहे, असे किरीट सोमय्यांनी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या