शिवसेनेच्या 'या' बड्या नेत्यावर किरीट सोमय्यांचा ५०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

किरीट सोमय्या
किरीट सोमय्या

मुंबई | Mumbai

भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) अनिल परब (Anil Parab) यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यावर मुंबईतील महाकाली गुंफेसाठी (Mahakali Guha) ५०० कोटी रुपये बिल्डरला दिले असा गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. ते गुरुवारी (८ सप्टेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी सोमय्या म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा तिसरा हात रविंद्र वायकर आहे. त्यांनी एक कारनामा केला आहे. मुंबई पालिकेने (Mumbai Municipal Corporation) मुंबईतील जोगेश्वरीच्या (Jogeshwari) २००० वर्षांपूर्वीच्या महाकाली गुफा आणि तेथे जाणाऱ्या रस्त्यासाठी ५०० कोटी रुपयांचे बांधकामाचे अधिकार एका बिल्डरला दिले.

हा बिल्डर अविनाश भोसले (Avinash Bhosale) असून तेही बहुतेक तुरुंगातच आहेत. तसेच उद्धव ठाकरेंचा उजवा हात संजय राऊत जेलमध्ये, डावा हात अनिल परब रिसॉर्ट तूटणार आहे, तर तिसरा हात असलेले रविंद्र वायकर यांचाही घोटाळा बाहेर येत आहे, असे ते म्हणाले.

पुढे दहशतवादी याकुब मेमनच्या (Terrorist Yakub Memon) कबरीच्या सजावटीच्या वादावर बोलतांना ते म्हणाले की, एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या घोटाळ्याचे स्मारक उद्ध्वस्त करायचे तर दुसरीकडे हे लोक हिरव्या रंगात रंगले आहे. एकाबाजूला स्वतःच्या भ्रष्टाचाराचे स्मारक करायचे तर दुसऱ्या बाजूला १९९३ च्या ब्लास्टमधील दहशतवादी याकूबचे स्मारक करत आहे.

तसेच ईश्वर साकडे आणि नरेश सराफ हे १९९३ चे पीडित आहेत. नरेश सराफ यांचा उजवा पाय गेला. आज ३० वर्ष झालेत. हे याकूबचे स्मारक बांधायला निघालेत. तर ईश्वर साकडे यांना गोळी लागली. उद्धव ठाकरे हे बघणार का? पालिका हे बघणार का? असा सवालही सोमय्यांनी केला

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com