Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यादुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विजयी

दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विजयी

दुबई । वृत्तसंस्था

मुंबई इंडियन्स विरुध्द किंग्ज इलेव्हन पंजाबच्या सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या. त्यात पंजाबने बाजी मारली.

- Advertisement -

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा एका दिवसात तीन सुपर ओव्हर सामने झाले. मुंबई व पंजाब यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत दोन सुपर ओव्हर खेळण्यात आल्या. त्यात दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबने बाजी मारली.

नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉकने संघाला सावध सुरुवात करुन दिली. परंतू रोहित शर्माच्या अपयशाची मालिका पंजाबविरुद्ध सामन्यातही कायम राहिली.

अर्शदीप सिंहच्या गोलंदाजीवर रोहित ९ धावांवर बाद झाला. यानंतर भरवशाचा सूर्यकुमार यादवही मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मुरगन आश्विनकडे झेल देऊन माघारी परतला, सूर्यकुमार एकही धाव करु शकला नाही.

चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या इशान किशननेही या सामन्यात निराशा केली. अर्शदीपच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर आश्विनकडे झेल देत आश्विन माघारी परतला. एकीकडे मुंबईचे फलंदाज माघारी परतत असताना डी-कॉकने एक बाजू लावून धरली होती.

कृणाल पांड्यासोबत डी-कॉकने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला. पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत कृणाल आणि डी-कॉकने काही शानदार प्रदर्शन केले. कुल्टर-नाईलच्या मदतीने पोलार्डने मुंबईला १७६ धावांचा पल्ला गाठून दिला.

१७७ धावांचा पाठलाग करताना पंजाबने चांगली सुरुवात केली. मयांक अग्रवाल आणि लोकेश राहुल या जोडीने मुंबईच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच दडपण आणण्यास सुरुवात केली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मयांक बाद होऊन माघारी परतला आणि पंजाबला पहिला धक्का बसला.

यानंतर मैदानावर आलेल्या ख्रिस गेलने लोकेश राहुलला चांगली साथ दिली. गेल राहुल चहरच्या गोलंदाजीवर सीमारेषेवर ट्रेंट बोल्टकडे झेल देऊन माघारी परतला, त्याने २४ धावा केल्या. यानंतर फटकेबाजी करणाऱ्या निकोलस पूरनला जसप्रीत बुमराहने उसळता चेंडू टाकत आपल्या जाळ्यात अडकवलं.

१७७ धावांचा पाठलाग करताना पंजाबचा संघाने अखेरच्या चेंडूवर हाराकिरी केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यात दुसऱ्या सुपर ओव्हर मध्ये पंजाब ने बाजी मारली

.

- Advertisment -

ताज्या बातम्या