Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यामहिलेची हत्या करून मृतदेह पुरला जंगलात; मारेकर्‍यास शिताफीने अटक

महिलेची हत्या करून मृतदेह पुरला जंगलात; मारेकर्‍यास शिताफीने अटक

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

तालुक्यातील दहिदी शिवारात (Dahidi Shivar ) कांद्याच्या शेतात पाणी देत असलेल्या महिलेचा खून करून अंगावरील दागिने लुटण्यास विरोध केल्याने झाल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात हा गुन्हा उघडकीस आणत संशयित मारेकरी किरण ओमकार गोलाईत वय 32 रा, साजवहाल यास जेरबंद केले आहे.

- Advertisement -

तालुक्यातील दहिदी शिवारात कांद्याच्या शेतात पाणी देत असलेल्या सुमनबाई भास्कर बिचकुले वय 28 रा दहिदी या महिलेचा निर्गुण खून करण्यात आल्याची घटना 30 जानेवारी रोजी उघडकीस आली होती पुरावा नष्ट करण्यासाठी मारेकऱ्याने मृतदेह जंगलात पुरून त्यावर पाळा पाचोळा टाकल्याचे निदर्शनास आले होते महिलेचे पाय कापलेले दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडून दहशतीचे वातावरण पसरले होते.

जिल्हा पोलीस प्रमुख शहाजी उमाप या गुन्ह्याची विषमता लक्षात घेत स्थानिक गुन्हे शाखेसह तालुका पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या होत्या अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपाधीक्षक पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील मयूर भामरे पोलीस पथकाने तपासाची सूत्रे वेगाने फिरवली होती.

सुमनबाईची हत्या करत लुटलेले दागिने हल्लेखोर करंज गव्हाण येथे सराफ व्यावसायिकाकडे विक्रीसाठी गेला होता मात्र पोलिसांनी या घटनेबाबत पूर्व सूचना दिली असल्याने संबंधित सराफ व्यावसायिकांने याबाबत पोलिसांना माहिती दिली सराफ दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये संशयित कैद झाला होता.

यावरून पोलिसांनी तपासाचा वेग अधिक वाढवला होता करंजगव्हान येथून हल्लेखोर कुसुंबा रस्त्याने देण्याची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी परिसर पिंजून काढण्यास प्रारंभ केला डोंगराळे शिवारात सदर संशयित असल्याचे कळतात पोलिसांनी शिवाराकडे धाव घेतली पोलीस आल्याचे पाहताच संशयिताने तलावात उडी मारली मात्र त्यास पोहता येत नसल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला हे पाहताच दोघा पोलिसांनी तलावात उडी मारून त्यास बाहेर काढत चौकशी केली असता त्याने किरण ओमकार गोलाईत असे नाव सांगितले.

सुमन बिचकुले ही महिला शेतात एकटी पिकांना पाणी देत असल्याचे पाहून तिच्या अंगावरील दागिने लुटण्यासाठी आपण पिण्याचे पाणी पाहिजे व मोरेवाडी गावाचा रस्त्याची माहिती घेण्याच्या उद्देशाने जवळ बोलावले यावेळी तिच्या अंगावरील दागिने लुटण्याचा प्रयत्न केला असता तिने प्रतिकार केल्याने फावड्याने तिला मारहाण केली व नंतर तिच्या साडीने गळा आवलला ती मृत झाल्यावर गळ्यातील सोन्याची पोत व हातातील चांदीचे कडे काढून घेतले यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दुचाकी वर टाकून जंगलात असलेल्या पाण्याच्या डबक्यात टाकून दिला त्या ठिकाणी महिलेच्या पायातील चांदीचे कडे काढण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाल्याने करंज गव्हाण येथे येऊन धारदार कोयता घेऊन पुन्हा मृतदेह टाकलेल्या ठिकाणी येऊन कोयत्याने दोन्ही पाय कापून चांदीचे कडे काढून घेतले नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत बुजवून त्यावर पाळा पाचोला टाकला होता अशी कबुली हल्लेखोर किरण गोलाईत याने पोलिसांना दिली आहे.

या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या तीन दिवसात छडा लावणार्‍या पोलीस पथकास जिल्हा पोलीस प्रमुख शहाजी उमाप यांनी पंचवीस हजाराचे रोख पारितोषिक घोषित केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या