Monday, April 29, 2024
Homeजळगावउसनवारीच्या पैशांसाठी तरुणाचे अपहरण

उसनवारीच्या पैशांसाठी तरुणाचे अपहरण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

उसनवारीने (usanwari money) घेतलेल्या 7 लाख रुपयांसाठी तरुणाचे (youth) अपहरण (Kidnapping ) करुन त्याला जैनाबाद परिसरात डांबून ठेवल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, तरुणाला धारदार चॉपरसह त्याला बेसबॉलची बॅट दाखवून पैशांसाठी धमकाविण्यात (Intimidation)आले. याप्रकरणी सागर सैंदाणे व शेखर सपकाळे या दोघ संशयितांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील सिंधी कॉलनीमध्ये सनी इंद्रकुमार साहित्या हा तरुण वास्तव्यास असून तो वडीलांसोबत दुकान चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करतो. सनी साहित्याला गरज असल्याने त्याने जैनाबाद येथील सागर सैंदाणे याच्याकडून दि. 6 मार्च रोजी 7 लाख रुपये उसनवारीने घेतले होते. त्यातील दीड लाख रुपये त्याने दि. 18 मार्च रोजी त्याला रोख स्वरुपात परत केले आहे. दि. 23 रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास सनी हा घरी असतांना त्याला सागर सैंदाणे याने फोन करुन तु मला पु.ना. गाडगीळ येथे भेटायला ये, असे सांगितले. त्यानुसार सनी हा लागलीच त्याचा मित्र पियुष मंदान याला सोबत घेवून पु.ना.गाडगीळ येथे भेटण्यासाठी गेला.

पैशांचे बोलण्यासाठी घेवून गेले घरी

सागर सैंदाणे हा चारचाकीतून सनी साहित्याला घेवून जात असतांना सनीने सैंदाणेला आम्हाला कुठे नेत आहात, असे विचारले असता, तो बोलला की तुझ्याकडे असलेले माझे उसणे पैसे तू परत कधी करणार आहेस. ते माझ्या आईसोबत दोन मिनिटे बोलण्यासाठी तुला घेवून जात आहे. असे सांगत त्याला सागर सैंदाणेच्या घरी घेवून गेले.

जेवणाला जातो सांगत गाडीत जबरदस्तीने बसविले

याचवेळी सागर सैंदाणे याच्याकडे असलेली (एमएच 09 एफबी 7727) क्रमांकाच्या गाडीत सागरने सनीचा हात पकडून तु गाडीत बस असे बोलून त्याला गाडीत बसविले. यावेळी आपण जेवणासाठी बाहेर जात असल्याने सांगून सनी सोबत असलेले आकाश दुबे, आदर्श पुरोहीत, पियूष मंदान यांना सुद्धा त्यांनी गाडीत बसविले. त्यानंतर गाडी चालविणारा शेखर सपकाळे याने गाडी भरधाव वेगाने जैनाबादच्या दिशेने घेवून गेला.

धारदार शस्त्रांची दाखविली धमकी

सागर सैंदाणेच्या घरी पोहचल्यावर त्यांनी घराच्या चौथ्या मजल्यावर नेवून दोघांनी त्यांच्याजवळील धारदार चॉपर व बेसबॉलच्या बॅटची धमकी दाखवित तुझ्या वडीलांना फोन करुन सांग की, पैसे घेवून या असे धमकाविले. त्यावर सनी याने लागलीच त्याच्या वडीलांना फोन करुन मला बळजबरीने अटकावून ठेवले असून तुम्ही ऐकटे येवू नका, त्यांच्याकडे धारदार हत्यारे आहे असे सांगितले.

अपरहण केल्याप्रकरणी गुन्हा

घटना घडल्यानंतर दुसर्‍या दिवशी सनी साहित्यचे वडील त्याला घेवून जिल्हापेठ पोलिसात तक्रार देण्यासाठी आले. याठिकाणी सनी साहित्या याने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित सागर सैंदाणे व शेखर सपकाळे या दोघांविरुद्ध अपहरण करुन डांबून ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या