Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याचार लाखांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण

चार लाखांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण

सटाणा | Satana

येथील पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर दोधेश्वर नाक्यावरील युवकास फूस लावून अपहरण केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

दोद्धेश्वर नाक्यावर चायनीजचा गाडा लावणार्‍या युवकास चौघांनी स्वत:ला पोलिस असल्याचे भासवून धाक दाखवत बळजबरीने गाडीत बसवले आणि चार लाख रुपयांच्या खंडणीसाठी मंगळवारी (ता.६) रोजी भरदुपारी अपहरण केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे.

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले असून शहर व तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

याप्रकरणी सटाणा पोलिसांनी अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक झाली आहे, तर दोन संशयित युवक अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या